ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

खडकी बस स्टॉप समोर अँटो पलटी होऊन 12 शेतमजूर गंभीर जखमी.

95 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वणी-यवतमाळ राज्य महामार्गावरील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]


मारेगाव तालुक्यातील वणी-यवतमाळ राज्य महामार्गावर खडकी बस स्टॉप समोर अँटो पलटी होऊन 12 मजुर जखमी झाले आहे.ते सर्व शिवनाळा येथील असुन नेहमी प्रमाणे अँटोने मारेगाव कडे येत असताना कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने अँटो पलटी झाला ही घटना आज दिनांक 26 डिसेंबर 2022 रोज सोमवारला सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास खडकी बस स्टॉप समोर घडली.

सविस्तर वृत्त असे की.

शिवनाळा येथील महिला मजूर अँटो ने मारेगाव मार्गे गोधणी येथील शेतकामासाठी जात असतांना खडकी बस स्टॉप समोर अँटोला कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व अँटो पलटी झाला.त्या अँटो मध्ये बसलेले बारा मजूर जखमी झाले.

जखमी मध्ये पार्वती रामभाऊ आत्राम (27), शकुली भुतू टेकाम (20) ,अर्चना पैकू आत्राम (17), संगीता भीमा आत्राम (17), मंगला रामेश्वर टेकाम (27), राजाबाई नागो टेकाम (25) , तानेबाई भीमा आत्राम (60), रविना शालीक टेकाम (22), कांता पैकू टेकाम (40), ज्योती सुनील आत्राम (29), अर्चना राजू टेकाम (25) या महिला मजुरांचा समावेश असून राजू टेकाम (42) हा शेतमजूर जखमी आहे.

हे सर्व मजूर मारेगाव तालुक्यातील शिवनाळा येथील रहिवाशी आहे.अपघात होताच रस्त्यांनी ये-जा करण्याऱ्या लोकांनी जखमींना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तर गंभीर जखमींना प्राथमिक उपचार नंतर पुढील उपचाराकरिता यवतमाळ येथे हलविण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर