ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

डोंबिवलीचा ‘नारी-नाद’ घुमला सातासमुद्रापार:९,१११ लेझीमच्या कडकडाटात मोडला वर्ल्ड रेकॉर्ड; ‘गिनीज बुक’मध्ये झाली नोंद

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत डोंबिवलीच्या शिरपेचात आज मानाचा तुरा रोवला गेला. कल्याण तालुक्यातील तब्बल ९,१११ महिला आणि विद्यार्थिनींनी एकाच तालावर सामूहिक लेझीम वादन करून सांगलीचा जुना विक्रम मोडीत काढला आणि ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवला. रविवारी पहाटे श्री संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलात हा अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला.भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ आणि ‘कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यापूर्वी सांगली येथे ७,३३८ महिलांनी एकत्र येत लेझीम वादनाचा विक्रम केला होता. मात्र, आज डोंबिवलीत ९,१११ महिलांनी साडेपाच मिनिटे विविध प्रात्यक्षिके सादर करत हा विक्रम आपल्या नावे केला. पहाटेपासूनच भगवा माहोल पहाटेपासूनच डोंबिवली आणि कल्याण परिसरातील शेकडो शाळांच्या विद्यार्थिनी आणि महिला भगिनी पारंपारिक वेशभूषेत मैदानात दाखल झाल्या होत्या. लेझीमच्या कडकडाटाने आणि ‘भारत माता की जय’, ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी सारा आसमंत दणाणून गेला होता. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी या विक्रमाची अधिकृत घोषणा केली आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पत्नी सुहासिनी चव्हाण यांच्याकडे मानाचे प्रमाणपत्र व मेडल सुपूर्द केले. हा विक्रम भारतमातेच्या चरणी समर्पित – रवींद्र चव्हाण या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले की, लेझीम ही आपली संस्कृती असून ती जपणे आपले कर्तव्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सशक्त भारताच्या संकल्पाची ही प्रचिती आहे. डोंबिवलीकरांनी जो इतिहास रचला आहे, तो मी भारतमातेच्या चरणी समर्पित करतो. त्यांनी यावेळी सर्व सहभागी महिला, शिक्षक आणि समितीचे आभार मानले. या सोहळ्यामुळे केवळडोंबिवलीच नव्हे, तर संपूर्ण राज्याची मान अभिमानाने उंचावली आहे.ढोल-ताशांच्या गजरात आणि विजयाच्या जल्लोषात या विश्वविक्रमी सोहळ्याची सांगता झाली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर