ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मारेगाव शहर हिंदू–मुस्लिम ऐक्याचे प्रतीक

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

शिवसेना (शिंदे गट)तर्फे मुस्लिम महिलांसाठी भव्य इफ्तार पार्टी

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव शहर हे नेहमीच हिंदू-मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे जिवंत उदाहरण म्हणून ओळखले जाते. या परंपरेला अधिक बळकटी देत पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने शिवसेना (शिंदे गट)तर्फे मुस्लिम महिलांसाठी भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व सौ.चेतना विशाल किन्हेकर यांनी केले.

मारेगाव येथील प्राथमिक शाळेच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुस्लिम समाजातील महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. रमजान महिन्यातील १८ व्या रोज्याच्या निमित्ताने आयोजित या इफ्तार कार्यक्रमात उपस्थित महिलांनी रोजा सोडून एकत्रित इफ्तार केला.

या प्रसंगी मुस्लिम महिलांकडून नात-ए-शरीफचे पठण करण्यात आले. समाजात शांतता, बंधुता व मानवता कायम राहावी तसेच सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी विशेष दुआही करण्यात आली. धर्म, जात आणि पंथ यापलीकडे जाऊन सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला.
मारेगाव शहरात अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने होत असल्याने हिंदू-मुस्लिम ऐक्य अधिक दृढ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

या प्रसंगी अॅड. हुमेरा अली, नगरसेविका अंजुम शेख नबी, खैरून शेख, रकिया शेख दिलदार, डॉ. केलोडे, आलिमा मुस्कान शरीफ, फरसेजहा शरीफ, उजमा शरीफ, नगरसेविका सौ. तारा खालिद पटेल, कल्पना ताई गावंडे (महिला तालुका अध्यक्षा), सौ. प्रतिभा झाडे (शहर अध्यक्षा), साधना अस्वले (महिला शहर उपाध्यक्षा), प्रभा ताई ढेंगळे (शहर उपाध्यक्षा), सोनाली शेंडे, कोमल ताई, सारिका चिकणकर, मंदा ताई धोबे यांच्यासह शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि मुस्लिम समाजातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सामाजिक सलोखा, धर्मनिरपेक्षता आणि परस्पर सन्मानाचा संदेश देणारा हा उपक्रम मारेगावच्या एकात्मतेच्या परंपरेला अधिक बळकटी देणारा ठरल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर