ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

चिंचमंडळ येथे महिला ग्रा.पं सदस्याच्या पतीकडून ग्राम सेवकास मारहाण

66 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ग्रामपंचायत चिंचमंडळ माशिक सभेत गदारोळ

मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

महिला सदस्यांनीही दिली विनयभंगाची तक्रार  मारेगाव तालुक्यातील ग्राम पंचायत चिंचमंडळची दिनांक 29एप्रिल2022 रोजी मासिक सभा असल्याने मासिक सभा घेण्यासाठी गेलेल्या ग्रामसेवकाला सभा सुरु होण्यापूर्वीच महिला सदस्यांच्या पतीने  मारहाण केल्याची तक्रार ग्रामसेवक किशोर खरात यांनी मारेगाव पोलिसात केली असून, महिला सदस्यानी सुध्दा ग्रामसेवका विरुद्ध विनयभंगाची तक्रार पोलिसात दिली असुन या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.
 
  शुक्रवार दिनांक 29 एप्रिल2022 रोजी चिंचमंडळ ग्रामपंचायतच्या मासिक सभा दुपारी 12 वाजता असल्याने या सभेकरीता ग्रामसेवक किशोर चिंदाजी खरात व ग्रामपंचायत कर्मचारी वेळेपूर्वी उपस्थित होते. दरम्यान या मासिक सभेकरिता ग्राम पंचायात सदस्य भाग्यश्री दिवाकर सातपुते या पतीसह उपस्थित झाल्या. यावेळेसच मारहाणीचा प्रकार घडला.

या संदर्भात शासकीय कामात अडथळा करित महिला सदस्याचे पती दिवाकर नामदेव सातपुते यांनी मारहार केल्याची तक्रार ग्रामसेवक किशोर खरात यांनी पोलिसात दिली.तर महिला सदस्याने ग्रामसेवकाने वाईट हेतूने बोलून विनयभंग केल्याची तक्रार पोलिसात दिली.


तक्रारीनुसार ग्रामसेवक किशोर खरात यांचेवर विनयभंगाचा तर दिवाकर सातपुते यांचेवर शासकीय कामात अडथळा आणि अनु .जाती / जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत मारेगाव पोलिसात शुक्रवारला रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असुन. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार  यांचे मार्गदर्शनात मारेगाव पोलिस करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर