ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 306 कोटींचा निधी:मंत्री छगन भुजबळ यांनी दिली माहिती; साधुग्रामसाठी 100% निधी मिळणार असल्याचा दावा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारने तब्बल 306 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज सोमवारी दिली. यावेळी त्यांनी नाशिकमधील रिंगरोड, मुख्य रस्त्यांची दुरुस्ती, भव्य वाहनतळ, भाविकांसाठी तात्पुरती निवारागृहे (साधुग्राम) आणि मिसिंग लिंक रोड यासारख्या प्रकल्पांना केंद्र सरकारकडून 100 टक्के अर्थसहाय्य मिळणार असल्याचेही सांगिले. छगन भुजबळ यांनी सांगितले की, नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026-27 हा धार्मिक सोहळा नाशिकच्या सर्वांगीण विकासाची मोठी संधी आहे, हा दूरदृष्टिकोन ठेवून आपण केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. केंद्र सरकारच्या ‘भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष अर्थसहाय्य योजने’अंतर्गत ‘नाशिक कुंभमेळा 2026-27’ साठी मी सादर केलेल्या प्रकल्पांपैकी 306 कोटींच्या प्रकल्पांना केंद्र सरकारने निधी मंजूर केला आहे. ही नाशिक जिल्ह्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. तसेच या निधीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करतो. नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी 15,172 कोटींचा निधी भुजबळ म्हणाले, केंद्र सरकारने राज्यांसाठी ‘भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना 2024-25’ सुरू केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी तब्बल 15,172 कोटी रुपयांचा भव्य विकास आराखडा आपण प्रशासनाकडून तयार करून घेतला होता. सन 2024 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात आला होता. सन 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत या प्रकल्पांना मंजुरी मिळविण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्याला यश आले आहे. मी सादर केलेल्या नाशिकमधील रिंगरोड, मुख्य रस्त्यांची दुरुस्ती, भव्य वाहनतळ, भाविकांसाठी तात्पुरती निवारागृहे (साधुग्राम) आणि मिसिंग लिंक रोड यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प मंजूर झाले असून, सदर प्रकल्पांसाठी केंद्र शासनाचे 100% अर्थसहाय्य मिळणार आहे. त्यामुळे राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार येणार नाही. या निधीतून आपले नाशिक जागतिक स्तरावरील आयकॉनिक टुरिस्ट सेंटर बनेल, असा मला ठाम विश्वास आहे. या निधीमुळे कुंभमेळ्याचे नियोजन अधिक सुलभ होणार असून, नाशिकच्या पायाभूत सुविधांना शाश्वत दर्जा प्राप्त होणार आहे. यापूर्वी आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे गोदाघाट परिसरातील ‘राम काल पथ’ उभारणीसाठी 99.14 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आता प्राप्त झालेल्या 306 कोटींच्या निधीमुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला खऱ्या अर्थाने वेग मिळणार असून, दळणवळण आणि परिवहन सुविधा अधिक गतिमान होणार आहेत. नाशिकच्या जनतेच्या व असंख्य भाविकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे हे फलित आहे, असे मी मानतो. नाशिकला जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी आणि विकासाचा हा रथ असाच वेगाने पुढे नेण्यासाठी मी यापुढेही प्रयत्नशील राहीन, असे भुजबळ म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर