ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

विदेही श्री.जगन्नाथ महाराज जन्मोत्सव सोहळा

81 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

बुरांडा खडकी येथे निघाली विदेही  सद्गुरु श्री जगन्नाथ महाराज यांची भव्य पालखी

रामनवमीच्या पावन पर्वावर निघाली पालखी

सुरेश पाचभाई संपादक:-विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव,

परिसराची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री संत जगन्नाथ बाबा देवस्थान वेगाव येथे जगन्नाथ बाबा यांचा भव्य जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात पार पडला.या वेळी गावातील व परिसरातील भाविकांची मोठ्या प्रमाणात मांदियाळी जमली होती.

श्री.सद्गुरू जगन्नाथ बाबा देवस्थान वेगाव हे परिसराची पंढरी मानल्या जाते.येथे कमिटी तर्फे व समस्त गावकऱ्यांतर्फे श्री संत जगन्नाथ बाबा यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी गावातील नागरिक तथा परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने हजर होते.

तसेच मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख) येथे दिनांक 17 एप्रिल 2024 रोज बुधवारला श्रीराम नवमी जन्मोत्सवा निमित्त श्री सद्गुरु जगन्नाथ महाराज मंदिर देवस्थान कमिटी बुरांडा (खडकी) यांचे वतीने जगन्नाथ महाराजांची दमणी सह भव्य पालखी काढण्यात आली.

भक्तिमय वातावरणात गावातील असंख्य महिला पुरुष व वृद्ध नागरिकांसहित छोट्या मुलांची उपस्थिती लक्षणीय होती. ही पालखी गावातील मुख्य मार्गाने  काढण्यात आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर