ब्रेकिंग न्यूज
⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात… ✦ ⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान
SP News Maregaon

बोरी (गदाजी) येथे होलिका पर्वावर भव्य गोटमार यात्रचे आयोजन.

95 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

सविस्तर वृत्त असे की..
मारेगाव [maregaon]तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या बोरी(गदाजी) येथे होलिका पर्वावर यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. व दिनांक 7 मार्च 2023 रोज मंगळवारला यात्रेला सुरुवात होत आहे.

बोरी गदाजी येथील गोटमार यात्रेला अनेक वर्षापुर्वीपासुन परंपरा असुन राज्यासह लगतच्या राज्यात ही यात्रा प्रसिद्ध आहे. गावाच्या बाजूला लागूनच असलेल्या वाहणाऱ्या छोट्याश्या नदीत श्री गदाजी महाराज यांचे मंदिर असून धुलीवंदणाच्या दिवशी येथे यात्रेचे आयोजन कमेटी तर्फे करण्यात येते.

धुलीवंदनाच्या दिवसी येथील मंदिराच्या परिसरात सकाळी कबड्डी खेड्ल्या जाते जो गडी शेवटी बाद होतो त्या गाड्याची (मढ) मिरवणुक संपूर्ण गावासभोवती वाज्या गाज्यात काढल्या जाते व त्याला मंदिर परिसरात आणल्या जाते.त्या नंतर प्रसिद्ध गोटमार खेळल्या जाते.मंदिरा शेजारी मचान उभारून त्यावर दगडासह काही भाविक असतात.

मचानीवर असलेले भाविक जमीनी वरील भाविकांवर दगडाने गोटमार करतात.तर जमीनी वरील भाविक माळ्यावरील भाविकावर दगडाने गोटमार करीत असुन जवळपास सुमारे 1 ते 2 तास हा खेळ सुरू असतो.जेव्हा एखाद्या भक्ताला दगड लागुन जखमी होऊन भक्त जमिनीवर कोसळतो तेव्हा हा खेळ थांबवुन जखमी भक्ताला मंदिरात घेवुन जातात.त्यानंतरच तो जखमी भक्त बरा होत असल्याची माहीती गावकरीऱ्या कडून प्राप्त होते.

गोटमारची परंपरा जोपासत ही यात्रा कोरोणाचा कालावधी सोडला तर सातत्याने भरवल्या जात आहे.बुधवार दिनांक 1 मार्च 2023 ला मंदिरात घटस्थापणा करण्यात येणार आहे.तर मंगळवार दिनांक 7 मार्च 2023 रोजी सकाळी 8 होळकर खेळ (मढ) रंगपंचमी मिरवणुक व त्या नंतर सकाळी 11 वाजता भव्य गोटमार व दुपारी 2 वाजता दहीहंडी आणी गोपाल काला दुपारी 4 वाजता महाराजांच्या पालखीची मिरवणूक आहे.

आणी दिनांक 10 मार्च 2023 रोज शुक्रवारला पाखड पुजा करण्यात येणार आहे.या दरम्यान यात्रेच्या आयोजनाची तयारी पुर्ण झाली असुन भाविकांनी दर्शनासाठी व यात्रेचा लाभ घेण्याचे विश्वस्तांनी आवाहन समस्त ग्रामवासी बोरी, गोटमार खेळाडू बोरी (गदाजी), ता.मारेगांव, जि. यवतमाळ यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर