ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

फडणवीसांच्या नेतृत्वात मुंबई सुरक्षित:मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत नाही- नवनाथ बन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ‘कॉमेडी सर्कस’

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबई आणि महाराष्ट्र सुरक्षित आहे. संजय राऊत तुमचे सरकार असताना मुंबईसह महाराष्ट्रात काय अवस्था होती. याचा विचार करा. विधानभवनात जो कोणी अफवा पसरवण्याचे काम करतो त्याला निश्चितच बेड्या ठोकत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अन् त्याला कारागृहात पाठवले जाईल, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, जय श्री राम म्हणण्यामध्ये आम्हाला कुठेही कमीपणा वाटत नाही प्रभु श्री रामांचे नाव घ्यायला आम्हाला लाज वाटत नाही. पण राऊतांनी औरंगजेबाचे नाव घेण्यात धन्यता वाटते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे. युद्धाच्या झळा काही प्रमाणात बसता आहेत पण त्यासोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही मोदी यांना सल्ला देऊ नका. तुम्हाला औरंगजेबाचा, अफजल खान यांचा उदो उदो केल्याने आनंद भेटतो. आम्हाला जय श्री राम म्हटल्याने. देवाभाऊवर टीका करण्याची तुमची लायकी नाही नवनाथ बन म्हणाले की, मुंबई सुरक्षित नाही अशा अफवा पसरवण्याचे काम संजय राऊत यांच्यामार्फत केले जात आहे. देवाभाऊ हे सक्षम गृहमंत्री आहेत. त्यामुळे कोणाची मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत झालेली नाही. जेव्हा पासून केंद्रात मोदी आणि राज्यात देवाभाऊचे सरकार आले तेव्हापासून मुंबईमध्ये एखादी चुकीचे गोष्टसुद्धा होत नाही कारण गृहमंत्री सक्षम आहेत. तुमचे गृहमंत्री 100 कोटींची वसुली कसे करत होते ते पाहा त्यामुळे तुमची देवाभाऊवर टीका करण्याची लायकी नाही. नाट्यमय वक्तव्यांमध्येच काँग्रेस व्यस्त नवनाथ बन म्हणाले की, स्वत: सालगडी असलेल्या संजय राऊत यांनी साला शब्दावर आक्षेप घेणं म्हणजे सर्वांत मोठा विनोद आहे. काँग्रेसला तर काही देशाची काळजी नाही कारण त्यांचे नेतृत्व राहुल गांधी करतात हे कॉमेडी सर्कस चालवण्याचे काम ते करतात. त्यांनी राऊत नावाचा जोकर दावणीला बांधला आहे. संजय राऊत हे राहुल गांधी यांच्या कॉमेडी सर्कसमधील जोकर झाले आहेत त्यांनी इतरांवर टीका करू नये. घरात बसून ठिपक्यांची रांगोळी पाहण्याची पद्धत आता संपली नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेमके काय करतात हे सांगण्याच्या भानगडीत राऊतांनी पडू नये. इराण-इस्रायल युद्धाचा आपल्या देशावर परिणाम होणार नाही यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठका घेत काळजी घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासारखे घरात बसून फेसबूक लाईव्ह केले नाही. उद्धव ठाकरे घरात बसून ठिपक्याची रांगोळी बघतात, फेसबूक लाईव्ह करतात. मोदीजी घरात बसून अशा रांगोळ्या बघत नाही. ते देश सुरक्षित ठेवण्यासाठी मेहनत करतात. लोकांमध्ये जातात, जनतेच्या संपर्कात असतात. घरबशा मुख्यमंत्र्यांसारखे काम करत नाही. देश अग्रक्रमाने पुढे जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सर्वात सुरक्षित आहेत. ते सर्वसामान्याची काळजी घेणारे पीएम आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर