ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

नगरसेवकाची सायबर पोलिसांकडे तक्रार, मुंबईतही स्वतंत्र तक्रार दाखल:महाजनांचा तरुणीसोबतचा फोटो व्हायरल; जळगावमध्ये फेसबुक युजरविराेधात गुन्हा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे एका तरुणीसोबतचे फोटो गुरुवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. हे फोटो एआयच्या मदतीने मॉर्फ असल्याचा दावा करण्यात आला असून, याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावचे नगरसेवक अरविंद भगवान देशमुख यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, भरत मस्के नावाच्या फेसबुक युजरने मंत्री महाजन यांचे फोटो एआयद्वारे मॉर्फ करून आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केला आहे. या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी बीएनएस कलम ३५६, ३(५) तसेच आयटी ॲक्ट कलम ६६(सी) आणि ६७ नुसार गुन्हा नोंदवला आहे. फोटो मॉर्फिंग हा सायबर गुन्हा एखाद्या व्यक्तीचा फोटो तंत्रज्ञानाच्या मदतीने बदलून तो चुकीच्या पद्धतीने पसरवणे हा सायबर गुन्हा आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (सी) नुसार संगणकीय साधनांचा वापर करून ओळख चोरी करणे आणि ६७ नुसार आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यावर कारवाईची तरतूद आहे. तसेच बीएनएस नुसार बदनामी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल होतात. आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केला आहे. या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी बीएनएस कलम ३५६, ३(५) तसेच आयटी ॲक्ट कलम ६६(सी) आणि ६७ नुसार गुन्हा नोंदवला आहे. मूळ फोटोतून इतर लोक होते, महाजनांची स्पष्टोक्ती व्हायरल फोटोबाबत खुद्द गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या माहितीनुसार, मूळ फोटोमध्ये अनेक जण उपस्थित होते. मात्र, जाणीवपूर्वक इतर लोकांना फोटोतून क्रॉप केले आणि केवळ दोनच जण सेल्फी घेत असल्याचे भासवून फोटो मॉर्फ करण्यात आला. यामागे कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी त्यांनी मुंबईतही स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर