ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भाजपने अदानींना सर्व काही विकले:आता गटारांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा, नरेंदर अन् सिलिंडर दोन्ही गायब – संजय राऊत

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भाजपने सर्व काही अदानींना विकले फक्त काही नदी नाले शिल्लक होते त्यातील मिठी नदी, मोदींनी जी योजना सांगितली आहे की गटारातून गॅस काढला पाहिजे, ही मिठी नदीच्या माध्यमातून साकार होऊ शकते. आता गटारांची किंमत आता वाढली आहे. मोदींच्या कृपेने नदी, नाले, गटारांची किंमत वाढली आहे, असा पंतप्रधान जगात झाला नाही, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, भाजपकडून गटारांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा अशी सांगण्याची स्थिती दिसते आहे. आम्ही मोदींच्या योजनेला पाठिंबा देत आहोत. भाजप मोदी यांच्या विरोधात कधीपासून जात आहे? नरेंदर अन् सिलिंडर भी गायब अशी घोषणा संसदेत गाजत आहे. यापुढे नरेंद्र मोदी संसदेत येतील असे वाटत नाही कारण त्यांना तोंड दाखवायला जागा नाही. मोदी यावर बोलत नाही संजय राऊत म्हणाले की, अखाती देशातील युद्धामुळे भारताला अत्यंत गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. पण सरकारकडून त्या संदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत की सर्व काही अलबेल आहे. एलपीजीची टंचाई अजिबात पडणार नाही, भारत सर्व परिस्थितीशी तोंड द्यायला सक्षम आहे. कुठेही सिलिंडरचे भाव वाढणार नाही. या अफवा महाराष्ट्राचे आणि केंद्राचे सरकार पसरवत आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू अशा राज्यात प्रचारात अडकलेले आहे. त्यांच्या प्रचार सभेतील कोणत्याही भाषणात या विषयाचा उल्लेख नाही. एलपीजी अभावी अनेक हॉटेल्स बंद संजय राऊत म्हणाले की, सिलिंडरसाठी रांगा लागलेल्या आहेत. 25 दिवस सिलिंडर मिळणार नाही असे चित्र आहे. अनऑर्गनाईज लेबर जाक हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे ती हॉटेल इंडस्ट्री 40 टक्के बंद झाली आहे. मुंबईसारख्या मोठ्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये एलपीजी अभावी हॉटेल्स बंद आहेत, त्यामुळे रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री एक शब्द बोलत नाही, लोकांनी काय करायचे.नोटबंदीच्या वेळी लाइनमध्ये लोकं मारली गेली. तेच सिलिंडरच्या रांगेत होईल अशी परिस्थिती देशभरात झाल्याचे दिसते आहे. हे सरकार जनताविरोधी संजय राऊत म्हणाले की, हे सरकार जनताविरोधी आहे.आंतरराष्ट्रीय राजकारणात अपयशी ठरल्याने आपल्या देशावर ही परिस्थिती ओढावली आहे. इराणकडून संवाद झाला असे सांगितले जात नाही. केंद्र सरकारकडून अफव पसरवल्या जात आहेत. इराणसोबत संवाद साधला गेला पाहिजे. इराणला नैतिक पाठबळ देणं गरजेचे आहे. युद्ध युद्धांच्या ठिकाणी आहे, पण आपण तटस्थ भूमिका घेणे गरजेचे होते. इराणच्या दुखात सहभागी होणं गरजेचे होते. केवळ तेलाचे टँकर सोडा इतकाच आपला संबंध आहे का तर नाही? असे राऊतांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर