ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पुण्यात तरुणाची सैराट स्टाईल हत्या:प्रेयसीने बोलावल्याने भेटायला गेला अन् तिच्या कुटुंबाने संपवले; घरकाम करणाऱ्या आईवर दुःखाचा डोंगर

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यात एका तरुणाची सैराट स्टाईल करण्यात आली आहे. सदर तरुण मैत्रिणीने फोन करून बोलावल्यामुळे तिला भेटण्यासाठी गेला होता. पण तिकडे गेल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी त्याची बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ माजली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, नागेश जाधव असे मृत तरुणाचे नाव आहे. तो आपल्या आईसह पुण्यातील राहतो. तो शिवाजीनगर परिसरात ऑफिस बॉय म्हणून नोकरी करत होता. तर त्याची आई घरकाम करते. नागेशचे एका अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. या प्रेमसंबंधांची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाली होती. यामुळे ते संतापले होते. त्यांनी शनिवारी सायंकाळी मुलीच्या मोबाईलवरून नागेशला फोन करून त्याला एकेठिकाणी बोलावले. मैत्रिणीने फोन करून बोलावल्यामुळे तो तत्काळ आपल्या आईला सांगून घराबाहेर पडला. पण तिथे पोहोचताच मुलीच्या कुटुंबीयांनी व त्यांच्या नातेवाईकांनी त्याला घेरून बेदम मारहाण केली. या मारहाणीत नागेश गंभीर जखमी झाला. या स्थितीत मुलीच्या कुटुंबीयांनी रात्री 8 च्या सुमारास मुलीच्या कुटुंबीयांनी नागेशच्या आईला फोन करून आम्ही तुमच्या मारले असून, तुम्ही त्याला घेऊन जा असे सांगितले. त्यानंतर नागेशच्या कुटुंबीयांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ते घटनास्थळी पोहोचले तेव्हाही नागेशला मारहाण सुरू होती. कुटुंबीयांनी कसे तरी त्याची सुटका करून तत्काळ त्याला लगतच्या रुग्णालयात नेले. पण तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी मुलीच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केलेत. पीडित कुटुंबीयांच्या मते, मुलीच्या वडिलांनी तिच्या मोबाईलवरून नागेशला मेसेज करून बोलावून घेतले. त्यानंतर त्याला मारहाण करून त्याचा जीव घेतला. या प्रकरणी कोथरूड पोलिसांत 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या दुसरीकडे, आपल्या नात्यातील मुलीला होणारा त्रास थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे धायरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशाल प्रशांत हबीब (28) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो व्यवसायाने टेलर होता. संशयित आरोपी आदित्य उमाप हा त्याच्या नात्यातील एका मुलीला त्रास देत होता. विशालने या प्रकरणी आदित्यला समज देऊन मुलीपासून दूर राहण्यास सांगितले होते. यामुळे आदित्यने मनात राग ठेवून 11 मार्च रोजी रात्री विशालला धायरी परिसरातील डीएसके रस्त्यावरून जाताना दळवीवाडी फाट्याजवळ अडवले. त्यानंतर आरोपीने आपल्याजवळील लाकडी बॅटने विशालवर जोरदार प्रहार केले. त्यात विशाल हबीब गंभीर जखमी झाला. रक्त्याच्या थारोळ्यातच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी आदित्य घटनास्थळावरून पसार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर