ब्रेकिंग न्यूज
FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज…
SP News Maregaon

वानोजादेवीत ‘शिवाजी महाराज महसूल अभियान’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

१६०५ नागरिकांचा सहभाग; २७११ शासकीय लाभांचे वितरण

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव : शासनाच्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान शिबीर – टप्पा १’ या उपक्रमाला वानोजादेवी येथे नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. शनिवार (दि.१४ मार्च २०२६) रोजी पार पडलेल्या या शिबिरात तब्बल १६०५ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, तर १० विविध शासकीय विभागांमार्फत एकूण २७११ लाभांचे वितरण करण्यात आले.

या शिबिराला वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय दरेकर यांनी विशेष उपस्थिती लावून नागरिकांशी थेट संवाद साधला. विविध योजनांचा लाभ मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. शासन-प्रशासन नागरिकांच्या दारात पोहोचविण्याचा उद्देश या शिबिरातून प्रत्यक्षात उतरल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाला तहसीलदार उत्तम निलावावाड, गटविकास अधिकारी बी. व्ही. व्हनखंडे, तालुका कृषी अधिकारी दिपाली खवले, तसेच डिमंडताई टोंगे, पुरुषोत्तम बुटे, अविनाश लांबट, देवा बोबडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील १० ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व कार्यकर्तेही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनाही या शिबिरासाठी निमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.एकाच ठिकाणी विविध शासकीय योजना व सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शासनाच्या लोकाभिमुख धोरणाचा हा प्रभावी नमुना ठरल्याची चर्चा परिसरात रंगली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर