ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

गँगस्टर रवी पुजारी ठाणे पोलिसांच्या ताब्यात:खंडणीच्या जुन्या प्रकरणात बंगळुरू येथून घेतले ताब्यात; कोर्टात हजर करणार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ठाणे पोलिसांनी बुधवारी कुख्यात गँगस्टर रवी पुजारी याला बंगळुरूतून ताब्यात घेतले. त्याच्यावर खंडणी उकळण्यासह इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला लवकरच कोर्टात दाखल करण्यात येणार आहेत. 1989 मध्ये गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवणारा गँगस्टर रवी पुजारी याने 1995 मध्ये भारतातून परदेशात पळ काढला होता. तो तेथूनच आपल्या हस्तकांमार्फत भारतातील विविध शहरांत गुन्हेगारी कारवाया करत होता. येथील हस्तक त्याला माहिती पुरवत होते. या माहितीच्या आधारावर रवी पुजारी बांधकाम व्यवसायिकांना खंडणीसाठी धमकावत होता. काही वर्षांपूर्वी त्याने मुंबईलगतच्या ठाण्यातील एक नगरसेवकाला खंडणीसाठी धमकी दिली होती. त्यानंतर ठाणे पोलिसांनी पुजारीच्या अनेक हस्तकांना अटक केली होती. त्यानंतर आता त्यालाही ताब्यात घेतले आहे. आफ्रिकेतील सेनेगल येथून झाली होती अटक भारतीय तपास यंत्रणांनी रवी पुजारी याला 2019 मध्ये पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथे अटक केली होती त्यानंतर त्याला भारतात आणले होते सध्या तो बंगळुरू येथील एका कारागृहात शिक्षा भोगत होता. ठाणे पोलिसांनी बंगळुरूला जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर हे पथक आज ठाण्यात दाखल झाले. आता पोलिस लवकरच त्याला न्यायालयात हजर करणार आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, ठाण्यातील कासारवडवली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या एका जुन्या प्रकरणात चौकशीसाठी रवी पुजारीला ताब्यात घेतले आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत रवी पुजारी याच्या विरोधात 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने काही वर्षांपूर्वी रवी पुजारीच्या दिल्ली स्थित दोन बहिणींनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर काही दिवस खंडणीसत्र थांबल्याचे चित्र होते. रवी पुजाराविरोधात 2016 मध्ये रेड कॉर्नर नोटीसही काढण्यात आली होती. त्याच्यावर मुंबईसह गुजरात, कर्नाटक, दिल्ली आदी ठिकाणी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गत महिन्यात अडकला होता लिफ्टमध्ये दुसरीकडे, रवी पुजारी याला गत महिन्यात मुंबई पोलिसांनी कोर्टात हजर केले होते. तेव्हा तो मकोका कोर्टाच्या इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकला होता. पोलिस पथक रवी पुजारी याला चौथ्या मजल्यावरून पाचव्या मजल्यावर घेऊन जात असताना, अचानकच न्यायालयाच्या इमारतीमधील लिफ्ट बंद पडली. ती चौथ्या व पाचव्या मजल्यादरम्यान थांबली. यावेळी पोलिस पथक व रवी पुजारी हे लिफ्टच्या आत अडकले होते. काही क्षणांसाठी परिस्थिती तणावपूर्ण बनली होती; परंतु पोलिसांनी तत्परता दाखवत, त्वरित न्यायालय परिसरातील लिफ्ट ऑपरेटरला पाचारण केले. त्यानंतर तांत्रिक पथक व लिफ्ट ऑपरेटरने लिफ्टला हळूहळू पाचव्या मजल्याच्या दिशेने वर उचलले. लिफ्टचे दरवाजे अंशतः उघडता यावेत, यासाठी त्यांनी तिला साधारणपणे अर्ध्या उंचीपर्यंत वर सरकवले. पोलिसांनी आपल्या सुरक्षा व्यवस्थेची अत्यंत काटेकोरपणे आखणी केली. त्यानंतर लिफ्टच्या आत अडकलेल्या प्रत्येकाला, एकामागून एक, काळजीपूर्वक बाहेर काढले. लिफ्टमध्ये उपस्थित असलेल्या सशस्त्र पोलिस कर्मचाऱ्यांनी यावेळी परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण राखले होते. यामुळे सुरक्षेत कोणत्याही प्रकारची कसूर झाली नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर