ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या मुलाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

2.1k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अर्जुनी येथील तलावामधील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथील तलावामध्ये एका 16 वर्षीय मुलाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दिनांक 25 मे 2025 रोज रविवारला सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

राकेश मोहन आत्राम वय अंदाजे 16 वर्षे रा. कुटकी ता. हिंगणघाट जि.वर्धा असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

राकेश हा नव्या वर्गामध्ये शिकत होता.त्याच्या शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे तो काही दिवसापासून अर्जुनी येथे आजोबाकडे राहत होता.आज सकाळी तो आजोबा बाहेरगावी गेल्याने आजोबाचे बैल पाणी पाजण्यासाठी अर्जुनी येथील तलावाकडे घेऊन गेला होता.बैल घेऊन शेताकडे गेला पण बराच वेळ झाला तरी मुलगा घरी परतला नाही.

त्यामुळे कुटुंबातील काही सदस्य त्याचा शोध घेण्यासाठी तलावाच्या दिशेने गेले असता त्यांना मुलगा घसरून तलावामध्ये बुडून असल्याचे दिसून आले.त्यांनी सदर घटनेची माहिती लगेच गावातील पोलीस पाटील यांना दिली.पोलिस पाटीलयांनी लगेच सदर घटनेची माहिती मारेगाव पोलीस स्टेशनला दिली.

माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळ पंचनामा करून त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. त्याच्या पश्चात आई-वडील व दोन बहिणी असा प्राप्त परिवार आहे.सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांचे मार्गदर्शनाखाली जमादार दिगंबर कनाके करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर