ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना कलावती बांदूरकर यांचा पाठिंबा

522 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

खाडे यांनी थेट शेतक-यांच्या बांधावर जात घेतली मतदारांची भेट

प्रमोद रा.मेश्राम मारेगाव

मारेगाव:- बोटोणी सर्कल येथे अपक्ष उमेदवार संजय खाडे यांचा प्रचार दौरा आज दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोज गुरुवारला करण्यात आला.या प्रचार दौ-यात जळका येथे त्यांनी कलावती बांदूरकर यांची भेट घेतली यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर केला.

त्यांनी जळका येथील पदयात्रेत सहभाग घेतला.या निवडणुकीत त्यांनी खाडे यांच्या पाठिशी उभे राहणार अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली.दरम्यान आज संजय खाडे यांनी थेट शेतक-यांच्या बांधावर जात शेतक-यांशी संवाद साधला.तर मारेगाव येथे झालेल्या प्रचार सभेत त्यांनी शेतक-यांच्या प्रश्नांवर जोरदार हल्लाबोल केला.यावेळी माजी आमदार विश्वास नांदेकर, नरेंद्र ठाकरे,गौरीशंकर खुराणा,संजय आवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आज सकाळी नरसाळा येथून संजय खाडे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली.त्यानंतर खैरगाव,खंडणी, बोटोणी,वागदरा,हटवांजरी,जळका, सराटी,बुरांडा,आवळगाव,मेंडणी येथे प्रचार दौरा झाला.या प्रचार दौ-यात त्यांनी शेतक-यांच्या बांधावर जात शेतक-यांशी संवाद साधला. संध्याकाळी मारेगाव येथे प्रचार सभा झाली.या प्रचार सभेत संजय खाडे यांनी शेतक-यांच्या प्रश्नांवर जोरदार हल्लाबोल केला.

मारेगाव तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक आत्महत्या होतात.मात्र या गंभीर प्रश्नांकडे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे ना सरकारचे,अशी टिका त्यांनी आपल्या भाषणात केली. यावेळी विश्वास नांदेकर,नरेंद्र ठाकरे, गौरीशंकर खुराणा, संजय आवारी यांनी देखील विरोधकांचा सडेतोड समाचार घेतला.  

कलावंती बांदूरकर यांचा संजय खाडेंना पाठिंबा
कलावती बांदूरकर या जळका येथील रहिवासी आहेत. 2008 साली त्यांच्या पतीने दुष्काळामुळे आत्महत्या केली होती.राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे संपूर्ण देशभरात त्या चर्चेत आल्या होत्या.आज संजय खाडे यांचा जळका येथे प्रचार दौरा झाला.यावेळी कलावती यांनी संजय खाडे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला.

कलावती बांदूरकर म्हणाल्या की सरकारचे कास्तकारांकडे दुर्लक्ष होत आहे. इतके वर्ष झाले तरी सोयाबीन,कापूस याला अजूनही तोच भाव मिळत आहे. इतक्या वर्षात माणूस बदलला,जग बदलले मात्र अद्यापही शेतक-यांच्या शेतमालाचा भाव काही केल्या बदलला नाही. यामुळे कास्तकार मरत आहे. किमान 10 हजार कापसाला व 7 हजार सोयाबीनला भाव मिळायला पाहिजे.यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचा देखील उल्लेख केला.

विदर्भ राज्य आघाडी तर्फे संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. विदर्भ राज्य आघाडीचे कार्याध्यक्ष अँड नीरज खांदेवाल यांनी पत्रक काढत खाडे यांना पाठिंबा जाहीर केला.तर शिवस्वराज्य मंच राज्यभिषेक सोहळा समितीतर्फे पत्रक काढत संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर