ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

महाड हिंसाचार प्रकरण:मुलगा फरार नाही, माझे त्याच्याशी बोलणे सुरू आहे; भरत गोगावलेंची कबुली; अटक टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाद

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषद निवडणुकीत झालेल्या राड्याप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले याच्या अडचणीत वाढ झाली आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या तुंबळ हाणामारीनंतर पोलिसांनी विकाससह 29 जणांवर गुन्हे दाखल केले असून तो पोलिस दप्तरी ‘फरार’ आहे. मात्र, “मुलगा फरार नसून मी त्याच्या संपर्कात आहे,” अशी जाहीर कबुली स्वतः मंत्री भरत गोगावले यांनी तुळजापूर येथे माध्यमांशी बोलताना दिली आहे. यामुळे मंत्र्यांच्या दबावाखाली पोलिस यंत्रणा काम करत आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी महाड नगरपरिषदेच्या मतदानावेळी शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली होती. या हाणामारीत विकास गोगावले यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करताच विकास गोगावले भूमिगत झाला. स्थानिक न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने तो सध्या कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. तुळजाभवानीच्या दरबारात गोगावलेंची कबुली धाराशिव दौऱ्यावर असताना भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधला. “माझा मुलगा फरार नाही, माझे त्याच्याशी नियमित बोलणे सुरू आहे. आम्ही अटकपूर्व जामिनासाठी आधी प्रयत्न केले होते, मात्र ते फेटाळले गेले. आता आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे. जर सुप्रीम कोर्टानेही जामीन दिला नाही, तर आम्ही त्याला स्वतःहून पोलिसात हजर करू,” असे भरत गोगावले म्हणाले. प्रशासनावर दबावाचा आरोप? पोलिस दप्तरी जो आरोपी ‘फरार’ म्हणून नोंदवला गेला आहे, तो जर मंत्र्यांच्या संपर्कात असेल, तर पोलिस त्याला अटक का करत नाहीत? असा संतप्त सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. “मंत्र्याचा मुलगा कुठे लपला आहे हे 24 दिवस पोलिसांना माहित नाही, पण वडिलांना माहित आहे; हे पोलिसांचे अपयश आहे की सत्ताधाऱ्यांचा दबाव?” असा प्रश्नही आता राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. नेमके प्रकरण काय? महाड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान सुरू असताना प्रभाग क्रमांक 2 मध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. याच दरम्यान शिंदे गटाचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या मारहाणीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप विकास गोगावले आणि त्यांच्या समर्थकांवर करण्यात आला आहे. या घटनेनंतर महाड पोलिस ठाण्यात विकास गोगावले यांच्यासह एकूण 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी भूमिगत झाले आणि आजपर्यंत ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर