ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

कौटुंबिक वादातून पतीचे टोकाचे पाऊल:पत्नीच्या विनयभंगाची तक्रार दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच संपवली जीवनयात्रा ​

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


एकीकडे पत्नीच्या अब्रूसाठी पोलिसांत धाव घेऊन न्याय मागितला, मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांतच पतीने मृत्यूला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथे घडली आहे. कौटुंबिक वादातून संतापलेल्या शुभम देवीदास चित्रीत (३२) या तरुणाने राहत्या घराच्या पोर्चमध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या ​घटनेची पार्श्वभूमी अशी की, १५ मार्च रोजी शुभमची पत्नी गावातीलच एका भाजीपाल्याच्या नर्सरीत कामाला गेली होती. सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास ती नर्सरीत एकटी असल्याचे पाहून स्थानिक रहिवासी मुकेश रामदास उके (३६) याने तिची छेड काढली. पीडित महिलेने हा सर्व प्रकार पती शुभमला सांगितला. आपल्या पत्नीसोबत घडलेल्या या प्रकारामुळे शुभम प्रचंड मानसिक तणावात होता. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी शुभम आणि त्याची पत्नी १८ मार्च रोजी दिघोरी (मोठी) पोलिस ठाण्यात गेले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुकेश उके याच्याविरुद्ध विनयभंगाचा (कलम ३५४) गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिस ठाण्यातून न्याय मागून घरी परतल्यानंतर पती-पत्नीमध्ये कोणत्यातरी कारणावरून जोरदार खडाजंगी झाली. ​हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापलेल्या आणि वैफल्यग्रस्त झालेल्या शुभमने रात्री ८:०० वाजेच्या सुमारास घरातील नायलॉनची दोरी घेतली आणि घराच्या पोर्चमध्येच गळफास लावून घेतला. ​शुभमने गळफास घेतल्याचे लक्षात येताच पत्नी आणि शेजाऱ्यांनी आरडाओरडा केला. ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत पोलिसांना पाचारण केले. दिघोरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. याप्रकरणी दिघोरी पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पत्नीच्या विनयभंगाचा मानसिक धक्का आणि त्यानंतर झालेला घरगुती वाद, या दोन टोकाच्या कारणांमुळे शुभमने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. पोलिस आता या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत असून या मृत्यूमागे अन्य काही कारणे आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर