ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

भोंदू अशोक खरातच्या ‘लीला’ आता पडद्यावर:दीपाली सय्यद यांची महत्त्वाची भूमिका, रुपाली चाकणकर साकारणार असल्याची चर्चा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या भोंदू अशोक खरात व त्याच्या कारनाम्यांवर आता चित्रपट येणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटात सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकारी दीपाली सय्यद प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत. त्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा या प्रकरणातील एक कथित प्रमुख संशयित असणाऱ्या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणार काय? अशी चर्चा सिनेरसिकांत रंगली आहे. भोंदू अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण व अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्याचे महिलांसोबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. प्रस्तुत प्रकरणात नाव आल्यामुळे रुपाली चाकणकर यांना प्रथम राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद व त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या पार्श्वभूमीवर आता अशोक खरातच्या कारनाम्यांवर एक मराठी चर्चा येणार आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी तथा अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे. दीपाली सय्यदने दिली चित्रपटाची माहिती दीपाली सय्यद याविषयी बोलताना म्हणाल्या, बिग बॉस स्पर्धेतून बाहेर आल्यानंतर मला भोंदू अशोक खरात प्रकरणाची माहिती मिळाली. एक असा बाबा समोर आला ज्याने सर्वत्र खळबळ माजवली. या प्रकरणी लवकरच एक चित्रपट येणार आहे. हा चित्रपट मी काढत नाही. त्याचे निर्माते वेगळे आहेत. पण त्यात एक कलाकार म्हणून मी तुम्हाला दिसेल. चित्रपटाची माहिती लवकरच सर्वांपुढे येईल. पण सर्वांनी अशा भोंदूंपासून सावध राहिले पाहिजे. हा एकटाच खरात नाही. असे अनेक खरात कुठे ना कुठे लपलेले असतील. त्यामुळे आपण कोणत्याही गोष्टीवर जागरूक राहिले पाहिजे. लवकरच तुम्ही मला भोंदू खरातच्या चित्रपटात पाहाल. रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिसणार का? दीपाली सय्यद प्रस्तुत चित्रपटात रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. याविषयी दीपालीला छेडले असता ती म्हणाली, मी या चित्रपटात भूमिका करणार आहे, पण ती कोणती? हे आत्ताच सांगितले तर काय मज्जा राहणार? तुम्ही चित्रपट पाहा. माझ्याकडे स्क्रिप्ट आली आहे. ती मला वाचू द्या. स्क्रिप्ट वाचल्यानंतर ती भूमिका मला आवडली पाहिजे. त्यानंतर पुढील महिन्यापासून या चित्रपटाचे प्रत्यक्ष शुटिंग सुरू होईल. त्यावेळी मी शुटिंगच्या ठिकाणीच पत्रकारांना मुलाखतीसाठी बोलावेन. दीपालीने या विषयी स्पष्ट उत्तर दिले नसले तरी, ती या चित्रपटात चाकणकरांच्या भूमिकेत दिसेल असा दावा केला जात आहे. राजकीय व्यक्तीवर आरोप होतच राहतात दीपाली सय्यद यांनी यावेळी प्रस्तुत प्रकरणात रुपाली चाकणकरांवर झालेल्या आरोपांवर भाष्य केले. ती म्हणाली, राजकारणात सक्रिय असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सतत आरोप – प्रत्यारोपाच्या फैरींना सामोरे जावेच लागते. त्यात काहीच नवे नाही. पण या संपूर्ण खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा खरोखरच काही सहभाग होता का? की प्रत्यक्षात वस्तुस्थिती काही वेगळीच आहे, हे तुम्हाला केवळ चित्रपट पाहिल्यानंतरच स्पष्ट होईल. दरम्यान, सदर चित्रपटात अशोक खरातच्या ढोंगीपणासह या प्रकरणाशी संबंधित महाराष्ट्राच्या राजकारणातील काही प्रभावशाली व्यक्तींचे वास्तवही उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ एका व्यक्तीच्या कथित कृष्णकृत्यापुरता मर्यादित न राहता सामाजिक व राजकीय पैलूंवर प्रकाश टाकणारा असल्याचीही चर्चा आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर