ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

सावंगा विठोबा नगरी भक्तीत लीन:‘चंदन उटी’ उत्सवाची रेलचेल सुरु, सेवाधारी भजनकारांचा सत्कार, मांड वाढवा कार्यक्रमही होणार‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जिल्ह्याच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथे ज्येष्ठ मास अमावस्येचे औचित्य साधून विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थानच्या वतीने हे कार्यक्रम पार पडणार आहेत. परिसरात सध्या भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थानच्या वतीने १५ जून, सोमवार रोजी सायंकाळी ५ वाजता संस्थान परिसरात अत्यंत भक्तिमय वातावरणात ‘चंदन उटी उत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. या धार्मिक सोहळ्यानंतर बाहेरगावाहून येणाऱ्या भाविक भक्तांसह समस्त ग्रामस्थांसाठी संस्थानच्या अन्नदान समितीच्या वतीने भव्य महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले आहे. गेल्या महिनाभरापासून १६ मे ते १५ जून दरम्यान अधिक मासानिमित्त मंदिरात अखंड जागृती भजन-मांड कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाचा सांगता सोहळा, म्हणजेच ‘मांड वाढवा’ कार्यक्रम १६ जून रोजी मंगळवारी सकाळी ९:०० वाजता पार पडेल. महाराजांच्या पवित्र अरज व आरतीने, भजनाच्या गजरात, विश्वस्त मंडळ व भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल. या अखंड भजनाच्या मांडीमध्ये महिनाभर दैनंदिन दिवसपाळीत निस्वार्थ भावनेने सेवा देणाऱ्या सर्व सेवाधारी भजनकार भाविकांचा संस्थानच्या वतीने सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या सर्व धार्मिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी परिसरातील तसेच दूरवरून येणाऱ्या भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. तन-मन-धनाने सहकार्य करावे. असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल तसेच विश्वस्त विनायक पाटील, वसंत शेंडे, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, प्रविण कुकडकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर, स्वप्निल चौधरी आणि संस्थानच्या सर्व कर्मचाऱ्यांनी केले. एसटी बसेसची व्यवस्था भाविकांना सावंगा विठोबा येथे जाण्यासाठी चांदूर रेल्वे तसेच अमरावतीहून एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे भाविकांना खासगी वाहनाने जास्त पैसे देऊन सावंगा विठोबा येथे जावे लागणार नाही. भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्यच नव्हे तर देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी ही सोय केली जाते. यामुळे त्यांना अमरावतीहून थेट सावंगा विठोबा, सावंगा विठोबा ते अमरावती अशी ये-जा करण्याची सुविधा मिळते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर