ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

भारत सर्वांचा देश राहिला, कारण आपण हिंदू आहोत:संघात जात-पात नाही; सर्व समाजाला सोबत घेऊन काम- मोहन भागवत

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सर्वांचा स्वीकार आणि सन्मान हा भारताचा स्वभाव आहे.आपल्या देशाचे विभाजन झाले त्यावेळी हिंदू-मुस्लीम यांच्यासाठी वेगळा देश म्हणून विभागला गेला. पाकिस्तान, बांगलादेशींनी मुसलमानांचा देश बनवला, भारत देश सर्वांचा बनला कारण आपण हिंदू आहोत, हीच चूक झाली हे म्हणणारी देखील नागरिक आहेत, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. मोहन भागवत म्हणाले की, संघाचे काम सर्व स्तरावर सुरू आहे यामध्ये आम्ही जात-पात करत नाही आम्ही भौगलिक क्षेत्र म्हणून काम करत असतो. शहरातील प्रत्येक परिसरात काम झाले पाहिजे. सर्व जातींच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही काम करतो. एससी-एसटी किंवा बाह्मण असे काही संघात नाही कोणीही सरसंघचालक होऊ शकते. जो संघासाठी वेळ देऊ शकेल असा माणूस संघचालक होऊ शकतो. विरोध करणारी मंडळी आपलीच मोहन भागवत म्हणाले की, संघाचे स्वयंसेवक जिथे जातात त्यांना माहिती असते की विरोध करणारी मंडळी सुद्धा आपलीच आहे. संघावर खूप अन्याय झाला, संघावर बंदी देखील घालण्यात आली पण जे झाले ते झाले समाज आपला असल्याने ते सोडून द्यायचे. अनेक वेळा लोक विरोध करतात पण नंतर संघाचे विचार आत्मसात करतात. भाषावाद होऊ नये मोहन भागवत म्हणाले की, समाजामध्ये भाषेचा वाद नाही काही लोकं असतात जे त्यावर वाद घालत असतात. हा स्थानिक आजार आहे त्याला मोठा करण्यात काही अर्थ नाही.तो पसरू नये यासाठी प्रयत्न आपण करू शकतो. राजकारणातील स्वार्थासाठी हे काम होत असते. पण हा वाद मोठा होता काम नाही. काहीच जण गुंडगिरी करतात त्याचा दोष समाजाला देऊन काही फायदा नाही. संघ लोकांवर संस्कार करतो मोहन भागवत म्हणाले की, संघ लोकांवर संस्कार करण्याचे काम करतो. त्यातून भ्रष्टाचार बंद होऊ शकतो. 19 वर्षांपासून 25 वर्षांपर्यत जर लग्न झाले आणि 3 मुले झाले तर मुले आणि त्यांचे पालक दोघेही अतिशय चांगले राहू शकतात. घरात जर एकापेक्षा जास्त मुले असतील तर मुलांचा विकास होत असतो. आपण 2.1 च्या खाली जात आहोत त्याकडे लक्ष घातले पाहिजे. सर्व शास्त्र सांगते की 3 अपत्ये असली पाहिजेत. पण याचा निर्णय कुटुंबियांचा आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर