ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

टीव्ही अभिनेत्याची मोलकरणीकडे शरीर सुखाची मागणी:नकार देताच छाती, पोट, गळ्यावर वार; ठाण्याच्या मीरा रोड परिसरातील घटना

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विविध टीव्ही मालिकांमध्ये काम केलेल्या एका अभिनेत्याने लैंगिक सुख देण्यास नकार देणाऱ्या एका 37 वर्षीय मोलकरणीची गळा चिरून हत्या केल्याची भयंकर घटना मुंबई लगतच्या ठाणे जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपीला विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावरून अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, आशिष मेश्राम असे आरोपीचे नाव आहे. तो एक टीव्ही अभिनेता आहे. त्याने काही मालिकांमध्ये कामही केले आहे. ते ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड रस्त्यावरील चंद्रेश अकॉर्ड सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये राहत होता. बुधवारी रात्री मृत मोलकरीण त्याच्याकडे काम करत होती. त्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. पण मोलकरणीने त्यास नकार दिला. अखेर संतापलेल्या आरोपीने तिचा गळा, छाती व पोटावर चाकूने सपासप वार केले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. पण पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर त्याला आंध्र प्रदेशातून बेड्या ठोकल्या. आरोपी अनेक महिन्यांपासून करत होता छळ पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला असताना त्यात काही धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी आशिष मेश्राम मोलकरणीकडे गत अनेक दिवसांपासून लैंगिक सुखाची मागणी करत होता. पण मोलकरणीने त्याची मागणी वारंवार धुडकावून लावली होती. त्यानंतरही आरोपी तिचा छळ करत होता. गंभीर बाब म्हणजे गत जानेवारी महिन्यात आरोपीने मोलकरणीच्या मुलाला फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. तुझ्या आईने माझ्याकडे काम करणे बंद केले किंवा माझ्या मागण्या मान्य केल्या नाही, तर मी तिला ठार मारेन, असे तो म्हणाला होता. महिलेच्या मुलाने केला होता चोप देण्याचा प्रयत्न ही धमकी मिळाल्यानंतर मोलकरणीच्या मुलाने आशिष मेश्रामला गाठून चोप देण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी तो सापडला नाही. अखेर काही दिवसांनी आरोपीच्या मोठ्या भावाने मोलकरणीला आश्वासन दिले की, आरोपी आशिष आता त्या फ्लॅटमध्ये राहत नाही. या आश्वासनानंतर मृत महिलेने पुन्हा त्या फ्लॅटवर काम करण्यास सुरुवात केली. पण बुधवारी रात्री ललिता कामावर आल्याचे पाहून आरोपी पुन्हा त्या फ्लॅटवर आला. त्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. पण यावेळी तिने नकार दिल्यामुळे अखेर त्याने तिची निर्घृण हत्या केली. कष्टाळू महिलेची हत्या झाल्याने संताप मृत महिला काशिमीरा भागात आपल्या पती व 4 मुलांसह राहत होती. तिचे पती चर्मकार आहेत. ती स्वतः 8-9 घरांमध्ये काम करून आपल्या संसाराला हातभार लावत होती. गत 3 वर्षांपासून मृत महिला मेश्रामकडे काम करत होती. एका कष्टाळू महिलेची अशा प्रकारे हत्या झाल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मीरा रोड पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, सध्या त्या ट्रान्झिट रिमांडवर शहरात आणण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर