ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

हटवांजरी (पोड) येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

111 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नळयोजनेचे काम 7 महीण्यानंतर सुध्दा अपुर्णच

ग्रामस्थ अजुनही तहाणलेलेच.

ग्रामस्थांचे गट विकास अधिकारी यांना निवेदन.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव : पाणी ही मुलभुत वअत्यावश्यक गरज असल्यामुळे 7 महिन्यापूर्वी नळ योजनेचे काम सुरु करण्यात आले. मात्र काम अपुर्णावस्थेत असल्याने मात्र हटवांजरी (पोड) येथील नागरीक अजुनही तहाणलेलेच असल्याने काम पुर्ण करुन पाणी पुरवठा तात्काळ सुरू करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा ईशारा गट विकास अधिकारी मारेगाव यांना हटवांजरी (पोड) येथील नागरिकांनी निवेदनातुन दिला आहे.

 तालुक्यातील हटवांजरी (पोड) हे आदिवासी बहुल असुन प्रत्येक गाव पोडात मुलभुत सुविधा मिळणे अपेक्षित असतांना हटवांजरी (पोड) येथे सोयी सुविधांचा अभाव असल्याचे  पहावयास मिळत आहे.पाणी हे जीवन अर्थात अमृततुल्य असुन पाण्याशिवाय कुणीही जगु शकत नाही. हटवांजरी येथे सुध्दा येथील नागरीकांना पाण्याची चणचण भासु नये यासाठी सात महीन्यापुर्वीच नळ योजणेचे काम सुरु करण्यात आले मात्र अजुनही अपुर्णावस्थेत असल्याने पाणी पुरवठा होत नसुन त्यामुळे येथील नागरिकांची पाण्यासाठी आजही भटकंती सुरु आहे.

ग्रामपंचायत प्रशासन पोडा कडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी निवेदतुन केला असुन येथील बंद पडलेली पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा  हटवांजरी (पोड) येथील नागरिकांनी गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे.यावेळी,प्रमोद मेश्राम,दीपक आत्राम,सुनील टेकाम,मीना मेश्राम,मंदा आत्राम,माया आत्राम,कविता टेकाम,संदिप आत्राम बापुजी कुमरे, गणेश आत्राम, संतोष टेकाम, सुरेश आत्राम,यांचे सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर