ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

हटवांजरी येथे अज्ञात व्यक्तीने 1 एकर पऱ्हाटी उपटली.

81 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

फुलोऱ्यावर आलेली कपाशीची झाडे उपटल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान.

हटवांजरी प्रतिनिधि:- रुपेश बोधाने

ऐन फुलोऱ्यात आलेली कपाशीची झाडे सरफिरूने उपटल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन शेती हंगामाच्या मध्यात हे सर्व घडल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केल्या जात आहे. विकृत मानसिकतेतून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

मारेगाव तालुक्यातील हटवांजरी येथील शेतकरी किसन जानबा घोडाम यांचे कडे सुमारे 7 एकर शेती आहे. त्यांची शेती हटवांजरी ते बुरांडा रस्त्याच्या कडेला आहे. त्यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या शेतामध्ये कपाशीची लागवड केलेली होती. काल दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोज मंगळवारला नेहमी प्रमाणे ते शेतीची कामे आटोपून घरी गेले होते. आणि आज दिनांक 24 ऑगस्टला 2022 रोज बुधवारला सकाळी ते शेतामध्ये आले.

त्यावेळी त्यांना शेतातील सुमारे एक एकर शेतामधील कपाशीची झाडे उपटलेली दिसली. हे पाहून शेतकऱ्याला धक्काच बसला. शेतीच्या ऐन बहाराच्या हंगामात शेतीचे झालेले नुकसान पाहून शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे.यावर्षी सुरुवातीला पाण्याने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबार – तिबर पेरणी करावी लागली होती.

त्या नंतर जुलै महिन्यात एवढा पाऊस पडला की, शेतकऱ्यांच्या शेतात सगळीकडे पाणीच पाणी होते. त्यामुळे पिकांच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे. आणि त्यात शेतीचे असे अज्ञात सरफिरूने केलेले नुकसान पाहून शेतकरी मायबाप आता जगायचे कसे असा टाहो फोडतांना दिसत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर