ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

रुपाली चाकणकरांचा पाय खोलात:भोंदू खरात प्रकरणात SIT ने बजावला समन्स; चाकणकरांना अटकच होणार, रुपाली ठोंबरेंचा दावा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भोंदू अशोक खरातची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना समन्स बजावला आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर चौकशी व त्यानंतर अटकेची टांगती तलवार उभी राहिल्याचा दावा केला जात आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी अशी शक्यता बोलून दाखवली आहे. अशोक खरातशी असणाऱ्या कथित संबंधांवरून रुपाली चाकणकरांना प्रथम राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद व त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून राजीनामा द्यावा लागला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे व राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी या प्रकरणी नाशिकच्या पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी करण्याची मागणी केली होती. यामुळे पोलिसांवरील विशेषतः या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकावरील दबाव वाढला होता. या सर्व पार्श्वभूमीवर एसआयटीने रुपाली चाकणकर यांच्याविरोधात समन्स बजावल्याचे वृत्त टीव्ही 9 या मराठी वृत्त वाहिनीने दिले आहे. या वृत्तानुसार, भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थान, मिरगाव या ट्रस्टवर सदस्य असल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांना हा समन्स बजावण्यात आला आहे. या प्रकरणी या ट्रस्टच्या सर्व आजी – माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे. समन्स बजावला म्हणजे आभाळ कोसळले नाही – बावनकुळे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. समन्स बजावला म्हणजे काही आकाश कोसळले नाही. तो चौकशीचा भाग आहे, असे ते म्हणालेत. रुपाली चाकणकर कायद्याने सहआरोपी – रुपाली ठोंबरे दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रस्तुत प्रकरणात रुपाली चाकणकर या कायद्याने सहआरोपी असल्याचा दावा केला आहे. त्या एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या, भोंदू बाबा प्रकरणात रुपाली चाकणकर कायद्याने सहआरोपी आहेत. कारण, त्यांचा या प्रकरणात असणारा प्रत्यक्ष हितसंबंध, त्यांनी पोलिसांवर टाकलेला दबाव व त्या स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्या ट्रस्टवर होत्या. त्यांचे खरातसोबत अनेक फोटो आहेत. यामुळे महिला अजून विश्वासाने तिथे जात होत्या. या भोंदूबाबाने रुपाली चाकरणकर यांच्याशी कटकारस्थान करून हे रॅकेट चालवले तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो. या सर्व गोष्टींचा तपास होण्यासाठी खरातच्या ट्रस्टवर जेवढे लोक आहेत, त्यांना सुद्धा कायद्याने सहआरोपी करणे क्रमप्राप्त आहे. राजकारणात आहोत म्हणून उगीच आरोप करायचे म्हणून मी हे आरोप करत नाही. परंतु या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली, तर जवळपास हजार-दीड हजार महिलांचे शोषण झाले असताना राज्य महिला आयोग डोळे झाकून बसल्या होत्या का. त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती का. त्यांना माहिती होती. त्यांचा या प्रकरणात सहभाग आहे. त्यामुळे जी काही नोटीस दिली आहे, त्यानुसार त्यांचा तपास करून त्यांना आरोपी म्हणून कोर्टात हजर केले जाईल, असे रुपाली ठोंबरे म्हणाल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर