ब्रेकिंग न्यूज
नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO Rohit Sharma : आयपीएल 2027 मध्ये KKR मध्ये जाणार? भर कार्यक्रमात अभिषेक नायरने आतली बातमी फोडली! हिटमॅनने ए… CRIME : लग्नाच्या शॉपिंगला निघालेल्या युवराजला संपवलं; Creta गाडीत तब्बल 7 तास मृतदेह, जुन्या ऑफिसच्या सहका… Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार Kalyan: ‘भेटायला बोलवलं, बंदूक दाखवली, भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाकडून सामूहिक अत्याचार’, तरुणीने तक्रारी… टीम इंडियाच्या एकाच वेळी दोन सीरिज, दोन्ही ठिकाणी निवड झालेला नितीश रेड्डी कुठे खेळणार? Sangli: 2018 सालचं आटपाडी प्रकरण, तीन मुलींसोबत…, 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला थेट फाशीची शिक्षा, सांगलीत का… Latur Crime : मृत्यूपूर्वी संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या डोक्याला टाके, प्रकरणात पुणे कनेक्शन! बहिणीला मु…
SP News Maregaon

जुन्या भाडेकरुकडून रक्तरंजित कांड, घरात घुसून घरमालकासह मेहुणीवर तलवारीने वार, महिलेचा जागीच मृत्यू, घटना C…

13 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरनगर परिसरातून संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. इथं एका माजी भाडेकरूने घरमालकासह तिघांवर घरात घुसून तलवार आणि चाकूने सपासप वार केले आहेत. या रक्तरंजित हल्ल्यात घरी पाहुणी म्हणून आलेल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे, तर घरमालक दांपत्य गंभीर जखमी झाले आहे. या संपूर्ण घटनेचा थरार सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

संगीता चौधरी असं हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. तर धर्मपाल डहाट आणि वनिता डहाट असं हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या घरमालक दाम्पत्याचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी माजी भाडेकरू रोशन निळकंठराव तराळ याला अटक केली आहे. जुन्या वादातून भाडेकरू रोशन याने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
नक्की काय घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रोशन नीळकंठराव तराळ हा पूर्वी धर्मपाल डहाट यांच्याकडे भाड्याने राहत होता. मंगळवारी आरोपी हातात तलवार आणि चाकू घेऊन अचानक डहाट यांच्या घरात घुसला. त्याने काही समजण्याच्या आतच घरात उपस्थित असलेले घरमालक धर्मपाल डहाट, त्यांची पत्नी वनिता डहाट आणि त्यांच्या घरी पाहुण्या म्हणून आलेली मेहुणी संगीता राजू चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला.

शस्त्रांनी केलेल्या या भीषण हल्ल्यात संगीता चौधरी यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर धर्मपाल डहाट आणि वनिता डहाट हे दोघेही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रेडिओच्या आवाजावरून झाला होता वाद
आरोपी रोशन तराळ हा पूर्वी डहाट कुटुंबाकडे भाड्याने राहत असताना मोठ्या आवाजात रेडिओ लावण्याच्या कारणातून वाद झाला होता. याच वादातून आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सीसीटीव्हीत कैद झाला थरार आणि आरोपीला अटक
आरोपी हातात धारदार शस्त्र घेऊन घरात शिरतानाचे आणि कुटुंबावर हल्ला करत असल्याचं दृश्य सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एवढा भीषण आणि रक्तरंजित हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून न जाता घरातच शांत बसून राहिला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत आरोपीला त्याच खोलीत बाहेरून कोंडून ठेवले आणि पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी रोशन तराळ याला अटक केली. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर