ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

मोठी बातमी- ऑपरेशन टायगरला ब्रेक:ठाकरे- शरद पवार गटातील खासदारांवर शिंदेंची नजर, ऑपरेशन तुतारीला आणखी वेगळे वळण

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेतून विरोधी पक्षातील खासदारांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात असतानाच, या रणनीतीला भाजप हायकमांडकडून ब्रेक लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः शरद पवार गटातील खासदारांना थेट शिंदे गटात न घेता, त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षातून एनडीएमध्ये प्रवेश करावा, असा सल्ला देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन तुतारी’च्या माध्यमातून शरद पवार गटातील 6 आणि ठाकरे गटातील 6 खासदारांना आपल्या पक्षात आणण्याची तयारी केली होती. सध्या शिंदे गटाकडे 7 खासदार आहेत. जर हे 12 खासदार त्यांच्या गटात सामील झाले असते, तर एकूण संख्या 19 वर पोहोचली असती. या वाढलेल्या संख्याबळामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असती. या संभाव्य वाढत्या संख्याबळाच्या जोरावर 2029 च्या लोकसभा निवडणुकीत किमान 19 जागांवर दावा करण्याची शिंदे गटाची रणनीती असल्याची चर्चा होती. मात्र, भाजपकडून या योजनेला अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. याच पार्श्वभूमीवर, दिल्लीतील अलीकडील भेटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना भेट दिली नसल्याची माहितीही समोर आली आहे, ज्यामुळे या राजकीय घडामोडींना आणखी वेगळे वळण मिळाले आहे. दरम्यान, ठाकरे आणि पवार गटातील काही खासदार शिंदे गटाकडे वळण्याच्या शक्यतेमागे काही कारणेही चर्चेत आहेत. महायुतीचे राज्य आणि केंद्रात मजबूत सरकार असल्याने भविष्यातील राजकीय स्थैर्याची हमी मिळते, असे अनेक खासदारांना वाटत असल्याचे बोलले जाते. तसेच विकासकामांसाठी निधी मिळवताना सत्ताधाऱ्यांशी जवळीक असणे फायदेशीर ठरते, हीदेखील एक मोठी बाब मानली जात आहे. शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची दिशा बदलणार का याशिवाय, पक्ष आणि निवडणूक चिन्हापेक्षा सध्याच्या सत्तेचा फायदा घेणे अधिक महत्त्वाचे असल्याची भावना काही खासदारांमध्ये निर्माण झाल्याचे सांगितले जाते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने निवडणूक लढवून मतदारांनी त्यांना स्वीकारल्याचा मुद्दाही या चर्चेत महत्त्वाचा ठरत आहे. मात्र, भाजप हायकमांडकडून आलेल्या या ‘ब्रेक’मुळे शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची दिशा बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर