ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

संजय राऊतांच्या शिवीगाळीनेच उबाठावर ही वेळ:रावसाहेब दानवेंची टीका, म्हणाले- तोडफोड करणे ही भाजपची संस्कृती नाही

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उबाठा गटातील सध्याच्या परिस्थितीसाठी भाजप नव्हे, तर पक्षातील अंतर्गत मतभेद आणि संजय राऊतांची आक्रमक भाषा जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला. यामध्ये भाजपचा कुठलाही हस्तक्षेप नाही..
माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले, उबाठा गटाचे सहा खासदार फुटले, त्यामध्ये भाजपचा कुठलाही हस्तक्षेप नाही. त्यांच्या अंतर्गत वादातून खासदार पक्ष सोडत आहेत आणि त्यासाठी भाजपला जबाबदार धरले जात आहे. हा त्यांचा कमकुवतपणा आहे. राऊतांची भाषा चांगली असती तर… संजय राऊतांवर निशाणा साधताना ते म्हणाले, राऊतांची भाषा अधिक संयमी आणि सुसंस्कृत असती तर आज उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती. सततची शिवीगाळ आणि आक्रमक वक्तव्यांमुळेच पक्षातील नाराजी वाढली आहे. तोडफोड करणे ही आमची संस्कृती नाही – दानवे
‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवरही दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. तोडफोड करणे ही भाजपची संस्कृती नाही. भाजपकडून कोणतेही ‘ऑपरेशन टायगर’ सुरू नाही, असे स्पष्ट करत त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. 6 जागा जिंकल्या, उरलेल्या 11 जागांवरही महायुतीचाच गुलाल
दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या 17 विधान परिषद जागांसाठी निवडणूक होत असून त्यापैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 11 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला. महायुतीची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक पातळीवरील पाठबळ पाहता निकाल महायुतीच्या बाजूने लागेल, असा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करण्याची गरज: ठाकरेंच्या शिवसेनेतील खदखद आता बाहेर पडतेय – बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जी खदखद अनेक दिवसांपासून होती, ती आता बाहेर पडत आहे. पक्षातील लोक का नाराज आहेत, खासदार आणि आमदार वेगळा विचार का करत आहेत, याचा गंभीरपणे विचार उद्धव ठाकरेंनी केला पाहिजे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर