ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मोठ्याने बोला! न्यायालयात अशोक खरात गोंधळला; हात जोडून दिलं उत्तर:न्यायाधीशांचे दोन प्रश्न, खरात मूक; नेमके काय घडले

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आज जिल्हा सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. सुरक्षेच्या कारणास्तव आरोपी अशोक खरात याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. विशेष तपास पथकाने यासाठी अर्ज केला होता, जो न्यायालयाने मान्य केला. न्यायालयात चार स्क्रीनच्या माध्यमातून ही ऑनलाईन सुनावणी पार पडली. या प्रकरणाचे तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी आणि सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली. सुनावणीदरम्यान सुरुवातीलाच न्यायाधीशांनी आरोपीला त्याचे नाव विचारले. मात्र आवाज स्पष्ट ऐकू न आल्याने न्यायाधीशांनी जरा मोठ्याने बोला, असे सांगितले. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आला की, तुमचे वकील म्हणून भाटे वकील इथे बाजू मांडत आहेत, तेच तुमचे वकील आहेत का? यावर अशोक खरातने होकारार्थी उत्तर दिले. सुनावणीच्या शेवटी न्यायाधीशांनी त्याला तुम्हाला काही सांगायचे आहे का? असा प्रश्न विचारला असता, खरातने हात जोडून नाही असे उत्तर दिले. या सुनावणीत तपास अधिकाऱ्यांनी गंभीर आरोप न्यायालयासमोर मांडले. त्यांनी सांगितले की, आरोपीकडून एका महिलेसोबत अत्याचार करण्यात आला असून ती गर्भवती राहिली होती. त्यानंतर तिला काही औषधे देऊन गर्भपात घडवून आणल्याचा संशय आहे. ही औषधे कुठून आणली, त्यामध्ये नेमके काय होते, याचा तपास अद्याप सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आरोपी पीडितांकडून आधारकार्ड आणि पॅनकार्ड मागत होता, त्यामागील उद्देश काय होता, याचाही तपास बाकी असल्याचे सांगण्यात आले. सरकारी वकिलांनीही या प्रकरणातील गंभीर बाजू अधोरेखित केली. त्यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपी पीडित महिलांना फसवण्यासाठी तू अप्सरा आहेस, अशा शब्दांचा वापर करत होता. जडीबुटीच्या नावाखाली दिली जाणारी औषधे नेमकी काय होती, हे शोधणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच पीडितांच्या नातेवाईकांकडून कागदपत्रे मागण्यामागे मालमत्तेचा काही डाव होता का, याचाही तपास करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे तपासासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली. दुसरीकडे, बचाव पक्षाने या मागणीला विरोध केला. आरोपीच्या वकिलांनी सांगितले की, हा दुसरा गुन्हा असून याआधीच 14 दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. तसेच अद्याप त्यांच्याकडे पूर्ण फिर्याद पोहोचलेली नाही. गर्भपाताच्या आरोपांबाबतही नेमका कालावधी काय होता, हे स्पष्ट नाही, असे त्यांनी मांडले. सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यावरही गुन्हा दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी वकिलांनी पुन्हा युक्तिवाद करताना आरोपी हा मास्टरमाईंड, असल्याचा दावा केला. गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्यात आले असून आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे सखोल चौकशीसाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे स्पष्ट करत त्यांनी कोठडी वाढवण्याचा आग्रह धरला. या सर्व युक्तिवादानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवत दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. खरात याला 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी शेवटी न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत अशोक खरात याला 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. म्हणजेच पुढील सात दिवस एसआयटीला तपासासाठी मिळणार आहेत. या कालावधीत प्रकरणातील विविध पैलूंवर सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे. वाढत्या आरोपांमुळे आणि नव्या खुलाशांमुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनत असून पुढील सुनावणीपर्यंत काय नवे उघड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर