ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

SC चा एक निर्णय अन् शिंदे गट भाजपत विलीन होईल:शिंदेंचे नेते ठाकरेंकडे परत जातील, मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल – सरोदे

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना नाव व धनुष्यबाण या पक्षचिन्हावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. वकील असीम सरोदे यांनी उद्याच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदेंकडून पक्ष व पक्षचिन्ह काढून घेतले तर तर त्यांचे महत्त्व कमी होऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मूळ शिवसेना अधिक बलवान होणार असल्याचा दावा केला आहे. विशेषतः शिवसेनेचे मॅटर सुप्रीम कोर्टात 37 व्या क्रमांकावर असल्यामु्ळे ते सुनावणीसाठी रिच होणे कठीण असल्याचेही ते यावेळी म्हणालेत. त्यामुळे उद्या सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी होणार किंवा नाही याविषया साशंकता आहे. शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर उद्या सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. या प्रकरणी सलग 2 दिवस युक्तिवाद ऐकून घेतले जाणार आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ या महत्त्वपूर्ण प्रकरणावर सुनावणी घेणार आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने उद्यापासून सुरू होणारी सुनावणी अंतिम असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आता हे प्रकरण लवकरच निकाली निघणार हे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर असीम सरोदे यांनी एका पोस्टद्वारे या खटल्यावर प्रकाश टाकला आहे. एका निर्णयामुळे सुरू झालेला खेळ सुप्रीम कोर्टच संपवेल असीम सरोदे म्हणाले, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह. सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे, पण 37 नंबरचे मॅटर सुनावणीसाठी reach होणे कठीण आहे. आता लोकांचा नवीन प्रश्न – जर एकनाथ शिंदेंकडून पक्ष चिन्ह व शिवसेना नाव काढून घेतले तर मुंबई महापालिकेत काय होईल? मला वाटते शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल व एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व एकदम कमी होईल. शिंदेसेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील व मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल. उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील. सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरु झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयाच कधीतरी संपवेल, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे. अपात्रतेच्या निर्णयावर तीव्र नाराजी उल्लेखनीय बाब म्हणजे असीम सरोदे यांनी महापालिका निवडणुकीच्या निकालावर भाष्य करतानाही सुप्रीम कोर्टाच्या अपात्रतेसंबंधीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, महापालिका निकालांमुळे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयाची आठवण झाली. सर्वात प्रथम एक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला कि राज्यपाल भगतसिंग यांनी बहुमत चाचणीसाठी दिलेला आदेश आम्ही थांबवू शकत नाही आणि तेथून ‘भाजपच्या एकनाथ शिंदे’ यांच्या बाजूने न्यायाचा तराजू झुकत गेला. मग सर्वोच्च न्यायालयाच्या पाच नायाधीशांच्या न्यायपीठाने निर्णय दिला तेव्हा निर्णयात लेखी नमुद केले कि, राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा सल्ला नसतांना बहुमत चाचणीचे दिलेले आदेश बेकायदेशीर होते. नंतर विश्वासाने कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे पाठविले आणि त्यांनी त्या निर्णयाची ठरवून वाट लावली. अश्याप्रकारे अमित शाह यांच्या महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे पक्षाची वाट मोकळी झाली. व नंतर जल्लोष …… लोकसभा, विधानसभा, नगरपरिषदा व आता महापालिका व पुढे जिल्हा परिषद व पंचायत समिती ….. भाजप चा जल्लोष सुरूच राहील, असे ते म्हणाले होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर