ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

सत्तेत जाताच मग्रुरी:फुटीर खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकारांना धमकी; म्हणाले- कॅमेरा बंद करा, नाहीतर मारून पाठवीन VIDEO

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. संजय दिना पाटील यांनी शिवसैनिकांना ‘बॉम्ब टाकून, घरात घुसून मारण्याची’ धमकी दिल्यावरून शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत आक्रमक झाले असून, त्यांनी पोलिस आयुक्तांकडे पाटलांच्या अटकेची मागणी केली आहे. मात्र, या प्रकरणावर जाब विचारणाऱ्या पत्रकारांवरच खासदार संजय दिना पाटील यांचा तोल सुटला. त्यांनी कॅमेऱ्यासमोर पत्रकारांना अत्यंत खालच्या पातळीची शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली आहे. “कॅमेरा बंद कर, नाहीतर मारून पाठवीन!” खासदार संजय दिना पाटील यांनी नुकतेच एका मुलाखतीत ‘माझ्या विरोधात आंदोलन केले तर बॉम्ब टाकेन’ असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानावर स्पष्टीकरण विचारण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर पाटील संतापले. त्यांनी कॅमेऱ्यासमोरच आपला तोल गमावला आणि पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. संतापाच्या भरात पाटील म्हणाले: “अरे भाई, बस झालं ना आता! किती अति करताय? बंद करा कॅमेरा. मी खासदार आहे हे विसरून जाईन. इज्जत करतोय तर इज्जत राखा. उगाच माझ्या डोक्यात जाऊ नका. मी तुम्हाला घराखाली थांबवतोय, जेवायला देतोय, आणि तुम्ही असे वागताय. आता जर पुन्हा मला विचारायला आलात, तर मार खाणार. मारून पाठवीन तुम्हाला. लिहून घ्या, रेकॉर्ड करा आणि सांगा कमिशनरला. काय कम्प्लेंट करायची ती करा!” सत्तेत आल्यावर एका विद्यमान खासदाराचा असा तोल ढळणे आणि थेट पत्रकारांना शिवीगाळ करत धमकावणे, यावरून आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संजय राऊतांचे पोलिसांना पत्र संजय दिना पाटील यांच्या या जीवघेण्या इशाऱ्यांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त आणि विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पाटलांवर कठोर कारवाई करत अटकेची मागणी केली आहे. पत्रात राऊत म्हणाले, “पाकिस्तानवर बॉम्ब टाकण्यापूर्वी मोदींना 100 वेळा विचार करावा लागतो, पण हे महाशय थेट बॉम्ब टाकण्याची भाषा करत आहेत. जर त्यांच्याकडे बॉम्ब आहेत, तर ते घरात बनवलेत की दहशतवाद्यांनी दिले? हा राष्ट्रीय सुरक्षेचा अत्यंत गंभीर मुद्दा असून याची एटीएसने (ATS) चौकशी करावी आणि त्यांच्यावर ‘यूएपीए’ (UAPA) सारख्या कठोर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा.” ते पुढे म्हणाले, “पाटील यांनी ‘मी याआधी पाच लोकांना मारले आहे’ असा दावा केला आहे. या दाव्याची स्वतंत्र चौकशी करून सत्यता तपासावी आणि त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा.” पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई न केल्यास जनतेच्या सुरक्षेसाठी आपण न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. भविष्यात कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यावर हल्ला झाल्यास त्याची नैतिक जबाबदारी खासदार पाटील यांच्यावरच राहील, असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांचे उत्तर आणि पाटलांची सारवासारव संजय राऊत यांच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “राज्यात आम्ही कुणाचेही घर बॉम्बने उडवून देऊ देणार नाही. पोकळ धमक्यांना कोणीही घाबरण्याचे कारण नाही. जर कोणी अशा धमक्या देत असेल, तर त्याला पोलिस योग्य ते उत्तर देतील.” दुसरीकडे, आपल्या विधानावर सारवासारव करताना संजय दिना पाटील म्हणाले होते की, “माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. मी ‘जन्मायच्या अगोदर असं एकदा झालं होतं, तेव्हा ५ लोक मेले होते’ असे म्हणालो होतो. मी कोणाला का मारेल?” मात्र, हे स्पष्टीकरण देतानाच त्यांनी पत्रकारांना शिवीगाळ केल्याने या प्रकरणाने आता आणखीच गंभीर वळण घेतले आहे. संबधित बातमी वाचा… सत्तेचा माज अन् मिंधे टोळीची संस्कृती!:पत्रकारांना दिलेल्या शिवीगाळीवरून खासदार संजय दिना पाटलांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक, थेट विधानसभेत पडसाद
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून शिंदे गटात गेलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना दिलेल्या ‘बॉम्ब’च्या धमकीनंतर आता नवा गदारोळ निर्माण झाला आहे. या प्रकरणावर जाब विचारणाऱ्या पत्रकारांनाच खासदार पाटील यांनी कॅमेऱ्यासमोर शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली. या धक्कादायक प्रकाराचे पडसाद आता थेट महाराष्ट्र विधानसभेत उमटले असून, काँग्रेस आणि ठाकरे गटाने या मुजोर वर्तनाविरोधात सरकारला धारेवर धरले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी धमक्या देणाऱ्यांना सोडणार नाही:कोणाचेही घर उडवू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धमक्यांच्या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे. कोणालाही धमकावणे किंवा कोणाचेही घर उडवण्यासारख्या धमक्या देणे सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी पोलिसांना कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश असल्याचे सांगितले. येथे वाचा संपूर्ण बातमी विरोध केला तर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन: संजय पाटलांच्या धमकीवरून संजय राऊत आक्रमक, पोलिस आयुक्तांकडे केली अटकेची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांना धमक्या देणे, बॉम्ब टाकण्याची भाषा करणे आणि जीवघेण्या इशाऱ्यांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. ‘माझ्या नादाला लागू नका’ वक्तव्यावर आक्षेप संजय राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून फुटून गेलेल्या खासदारांविरोधात राज्यभरात आंदोलने सुरू असताना संजय दिना पाटील यांनी आंदोलकांना गंभीर धमक्या दिल्या. “माझ्या नादाला लागू नका, नाहीतर हॉस्पिटलमध्ये किंवा स्मशानात पाठवीन,” अशा वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर