ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंना घरचा आहेर:तीन वर्ष आधीच उमेदवार ठरवण्याचा राऊतांचा सल्ला, उबाठा गटातील दुफळी पुन्हा चव्हाट्यावर- नवनाथ बन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


संजूबाबा राऊत हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी सांगितले की 3 वर्षे निवडणुकीसाठी आहेत, त्यानंतर लोकसभा निवडणूक आहे. 3 वर्षांनंतरचे उमेदवार आतापासून ठरवले पाहिजे, संघटन बांधणी आतापासून केली पाहिजे. निवडणूक कोण लढणार याबद्दल निर्णय घेतला पाहिजे असा सल्ला संजूबाबा राऊत यांनी जळगावमध्ये बसून उद्धव ठाकरेंना दिला आहे. कारण उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडत नाही, आदित्य ठाकरे घराबाहेर पडत नाही, असा टोला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला आहे. उबाठा गटातील दुफळी संजय राऊतांनी जो उबाठाला घरचा आहेर दिला त्यावरुन दिसून येते. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत तुमच्या सरकारने शेतकऱ्यांना काहीही मदत केली नाही. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करत नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. हे सरकार शेतकऱ्यांचा विचार करणारे आहे. म्हणून कोणतीही निवडणूक नसताना देवाभाऊंच्या सरकारने शेतकरी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. मविआने केवळ आश्वासन दिले आणि घरात बसून कारभार केला. ‘संकटमोचक’ रस्त्यावर, तर तुमचे नेते ‘घरकोंबडे नवनाथ बन म्हणाले की, संकटमोचक रस्त्यावर उतरतात, शेतकऱ्यांमध्ये जातात त्यांची कामे करतात. तुमचे नेते कुठे आहेत? तुम्ही घरकोंबडा म्हणून काम करतात. ते जळगावमध्ये जात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे जाणार आहेत का? आदित्य ठाकरे मराठवाड्यात नुकसानीची पाहणी करणार का? मागच्या वेळी तुम्ही पाहणी करायला गेले आणि ड्रायफ्रुटस खात बसले. संकटमोचकावर बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही ते जनतेमधील नेते आहेत. राऊत एक काय ते ठरवा नवनाथ बन म्हणाले की, जळगावमध्ये उबाठाची गुंडगिरी सुरू आहे. संदीप कर्णिक नावाचे अधिकारी चांगले काम करतात म्हणतात नेमके एकच काही तरी सांगा. कुणाच्या दरबारात कोण जात होते हे राऊतांनी सांगू नये. खरातचे कारनामे समोर येताच त्याला अटक करण्याची हिंमत देवाभाऊंनी केली. भाजप सरकार कोणतेही चुकीचे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पाठिशी घालत नाही. उद्धव ठाकरे सरकारने वाझे सारख्या खंडणी वसूल करणाऱ्यालादेखील समर्थन केले आहे. मविआत समन्वय नाही नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेस परस्पर उमेदवार देणार असे जाहीर करते. त्यांच्यामध्ये समन्वय नाही. हे आपल्याला प्रत्येक निवडणुकीत दिसून आले. संजय राऊत हे शरद पवारांची प्रवक्तेगिरी करत राहुरीवर शरद पवारांचा हक्क आहे सांगत आहेत. त्यांचे असे झाले आहे की मीठ उबाठाचे खायचे अन् काम शरद पवारांचे करायचे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर