ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सुप्रिया सुळे भाजपच्या जवळ गेल्याचे चित्र:सुनेत्रा पवारांच्या विरोधातील काँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात; मोरेंच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापलं

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत थेट लढत रंगणार आहे. दरम्यान, आकाश मोरे यांनी अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यास आपण निवडणुकीतून माघार घेऊ, असे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या वडिलांनी, माजी आमदार विजयराव मोरे यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करत राजकीय वातावरण तापवले आहे. विजयराव मोरे यांनी शरद पवार यांच्यावर थेट टीका केली. शरद पवार आता केवळ कुटुंबापुरता विचार करत आहेत. वयोमानानुसार त्यांच्या राजकारणात बदल झाला आहे, असा आरोप त्यांनी केला. मी शरद पवारांपेक्षा दोन महिन्यांनी मोठा आहे आणि त्यांच्या राजकारणाची मला पूर्ण जाण आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी असेही नमूद केले की, जर शरद पवार यांनी या निवडणुकीत उमेदवार दिला असता, तर त्यांनी त्यांचा प्रचार केला असता. पुढे बोलताना विजयराव मोरे यांनी काही वादग्रस्त मुद्दे उपस्थित केले. त्यांनी गौतम अदानी आणि शरद पवार यांच्या मैत्रीचा उल्लेख करत काही संस्थांना मदत झाल्याचे सांगितले. तसेच 2024 च्या निवडणुकांमध्ये त्यांनी शरद पवार गटासाठी प्रचार केला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, सुप्रिया सुळे या भाजपच्या जवळ गेल्याचे चित्र दिसत असल्याचा दावा त्यांनी केला. इतिहास सांगताना विजयराव मोरे म्हणाले की, त्यांच्या राजकारणाची सुरुवात समाजवादी पक्षातून झाली. 1967 मध्ये त्यांनी शरद पवारांच्या विरोधात प्रचार केला होता, तर 1972 मध्ये त्यांच्याविरोधात निवडणूकही लढवली. नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर 1990 साली विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्यात शरद पवारांचा मोठा वाटा होता, असे त्यांनी मान्य केले. तरीही 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यानंतर त्यांनी त्यात प्रवेश केला नाही. आजही त्यांचे शरद पवारांशी वैयक्तिक संबंध चांगले असल्याचे त्यांनी सांगितले. 23 एप्रिल रोजी मतदान, 4 मे रोजी निकाल दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक अजित पवार यांच्या 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या निधनामुळे होत आहे. या निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार आणि आकाश मोरे यांच्यातील लढत अधिकच लक्षवेधी ठरत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर