ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो:पण आता वेळ आलीय, नीतेश राणेंचा इशारा; नीलेश म्हणाले – नारायण राणेंना बाजूला सारल्याने पराभव

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


‘पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो. पण आता ती वेळ आली आहे,’ असे म्हणत भाजप नेते आणि मंत्री नीतेश राणे यांनी आता बोलण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ते आपले बंधू नीलेश राणे यांच्यावर काही बोलतात की युतीतल्या नेत्यांवर याची उत्सुकता लागली आहे. नीतेश यांच्या या वक्तव्यावर नीलेश राणे यांनी मात्र कसलिही प्रतिक्रिया दिली नाही.

नीतेश नेमके काय म्हणाले हे माहिती नाही. ते जाणून घेईन आणि त्यानंतरच आपण बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच निर्णय प्रक्रियेतून नारायण राणेंना बाजूला सारल्याने कोकणात पराभव झाल्याचेही त्यांनी ठासून सांगितले. नेमके प्रकरण काय? कोकणात झालेल्या नगरपरिषद निवडणुकांतील वादाने साऱ्या राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. ऐन निवडणूक प्रचारात नीलेश राणे यांनी भाजपच्या कार्यकर्त्याची घरी स्टिंग ऑपरेशन केले अन् पैशांची बॅग पकडली. यावेळी त्यांनी भाजपवर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केला.

भाजपने संस्कृती बिघडवल्याचाही दावा केला. त्यांच्याविरोधात नीतेश राणेही आक्रमक झाले. हा वाद उभ्या महाराष्ट्राने पाहिला. त्यानंतर लागलेल्या निकालात बहुचर्चित कणकवली आणि मालवणमध्ये शिवसेनेच्या नीलेश राणे यांनी वर्चस्व गाजवले. या विजयानंतर आता नीतेश राणे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. काय म्हणाले नीतेश राणे? कोकणात भावांभावांमध्ये अतिशय प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीतल्या जिव्हारी पराभवानंतर भाजप नेते आणि मंत्री नीतेश राणे यांनी एक सूचक ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्यात.

नीतेश आपल्या ‘एक्स’वरील ट्विटमध्ये म्हणतात की, ‘गप्प होतो..पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी.. पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात..पण आता ती वेळ आली आहे.!’ असे गर्भित इशारेवजा प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्यामुळे ते काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे. नीलेश राणे यांचींही प्रतिक्रिया विजयानंतर नीलेश राणे आज मुंबईत पोहचलेत. एका वृत्तवाहिनीने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळेस त्यांनी विजयाबद्दल आनंद व्यक्त केला.

नारायण राणे साहेबांना काही लोकांनी बाजूला सारले. त्यामुळे हा संघर्ष येथे पाहायला मिळाल्याचे ते म्हणाले. ही पक्षाची नव्हे, तर काही लोकांची चूक होती. नारायण राणे यांनी मला माघार घ्यायला सांगितली असती, तर मी निवडणूक लढवलीच नसती, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. सोबतच नारायण राणेही या विजयाने खूप आनंदी झाले नसतील. मात्र, ही वेळ आमच्यावर आणल्याचे त्यांनी सांगितले. नीतेश राणे ट्विट आपण पाहिले नाही. ते जाणून घेतल्यानंतर बोलू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पुढे काय होणार? निवडणूक निकालानंतर नीलेश राणे यांनी नारायण राणे यांना या पूर्ण प्रक्रियेतून बाजूला सारल्याने आपण ही निवडणूक लढवल्याचे स्पष्ट केले.

नारायण राणे सोबत असते आणि शिवसेना भाजपमध्ये युती झाली असती, तर ही वेळच आली नसती, असेही त्यांनी सांगितले. मात्र, आता नारायण राणे यांना कोणी बाजूला केले? नीलेश म्हणतात की पक्ष नव्हे, तर काही लोक? हे लोक नेमके कोण होते? असा प्रश्न आता समोर येतोय. नीतेश राणे हे नीलेश राणे यांच्यावर काही बोलणार की, या लोकांवर अथवा भाजपवर याची उत्सुकता लागली आहे.

त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीपूर्वी कोकणात पेटलेले धग काही केल्या कमी होताना दिसत नाही. इथून पुढे आणखी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगण्याची शक्यता आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर