ब्रेकिंग न्यूज
⚡ पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसवर काळाचा घाला, थेट पूलावरून खाली कोसळली गाडी, 21 हून अधिक प्रवासी बसमध्ये ✦ ⚡ News18 Marathi Headlines | 13 NOV | 9 AM | Sanjay Shirsat News | NCP Merger | Shiv Sena | Fadnavis ✦ ⚡ अवघ्या 10 हजारांची गुंतवणूक करेल मालामाल, मधमाशी पालनाचा दुहेरी फायदा, शेतकऱ्यांनी काय करावं? Video ✦ ⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू ✦ ⚡ Cricket Rule : ना कॅच, ना रन आऊट, ना बोल्ड… अंपायरने भलत्याच कारणासाठी दिलं आऊट, क्रिकेटमधली सगळ्यात विचि… ✦ ⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह…
SP News Maregaon

सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात बीड जिल्हा नियोजनाला वेग:भावनिक आणि विकासाभिमुख अशा दोन्ही अंगांनी महत्त्वाची बैठक; धनंजय मुंडे भावूक

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बीड जिल्ह्याच्या विकासाची अनेक वर्षे अपूर्ण राहिलेली स्वप्ने साकार करण्यासाठी आता सर्वांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, अशी हाक माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी खंबीरपणे उभे राहण्याची वेळ आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलताना त्यांनी भावनिक शब्दांत उपस्थितांना एकजुटीचे आवाहन केले. स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्हा नियोजन समितीची ही पहिली बैठक असल्याने सभागृहात वेगळेच वातावरण होते. बैठकीच्या सुरुवातीलाच धनंजय मुंडे यांनी शोक प्रस्ताव मांडत अजित पवारांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी उपस्थित सदस्यांना उद्देशून जिल्ह्याच्या विकासासाठी एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली ही बैठक केवळ औपचारिक नव्हती, तर भावनिक आणि विकासाभिमुख अशा दोन्ही अंगांनी महत्त्वाची ठरली. मुंडे यांनी आपल्या भाषणात अजित पवारांशी असलेल्या वैयक्तिक नात्याचा उल्लेख केला. अजितदादा हे माझ्यासाठी कायम वडिलकीचा आधार होते. आमच्यातील नाते अतिशय वेगळे आणि आत्मीयतेचे होते. त्यांच्या अकाली जाण्याने केवळ माझेच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे, असे ते म्हणाले. अजित पवारांनी अल्प कालावधीत बीड जिल्ह्याच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची आठवण करून देत त्यांनी काही योजनांचा विशेष उल्लेख केला. संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यात 11 वसतिगृहांच्या उभारणीसाठी 159 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात अजित पवारांनी स्वतः शब्द दिला होता, अशी आठवण मुंडेंनी उपस्थितांसमोर मांडली. त्या आश्वासनाची पूर्तता करण्याची जबाबदारी आता सर्वांची असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. जिल्ह्याच्या विकासासाठी अशा योजनांना गती देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक दरम्यान, अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून पालकमंत्रीपदाची जबाबदारीही स्वीकारली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा नियोजन समितीची ही पहिली बैठक पार पडली. त्या मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाल्या. याच दिवशी त्यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठकही घेतली. या पार्श्वभूमीवर बीडमधील बैठक विशेष महत्त्वाची ठरली. भावनिक वातावरणात झालेल्या या बैठकीतून एकत्रितपणे विकासाच्या दिशेने पुढे जाण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…. अजितदादांनंतर सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजनाची पहिली बैठक:अजितदादांची उणीव; 1600 कोटी वाढीव निधीची मागणी अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठा बदल झाला. त्यांच्या जागी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही स्वीकारली. या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अजित पवारांच्या अनुपस्थितीत ही बैठक होत असल्याने वातावरणात भावनिक छटा होती. पुणे विभागीय कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती, तर सुनेत्रा पवार मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाल्या. पूर्ण बातमी वाचा….

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर