ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

गायगाव देवस्थान “गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दुमदुमले:गायगावच्या प्राचीन श्री गणपती मंदिरात पहाटेपासून भक्तांच्या लांब रांगा‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अधिक मास अर्थात धोंड्याच्या महिन्याचा समारोप जवळ आल्याने जिल्ह्यातील प्रसिद्ध व प्राचीन गायगाव येथील श्री गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. अधिक मासाचे शेवटचे दिवस असल्याने पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातून मोठ्या संख्येने भाविक गणरायाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. हिंदू धर्मात अधिक मासाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या पवित्र काळात पूजा, अर्चना, जप आणि देवदर्शनाला भाविक प्राधान्य देतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून गायगावच्या या देवस्थानाबाबत भक्तांमध्ये अढळ श्रद्धा आहे. आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी अनेक भक्त येथे नवस बोलतात आणि नवस पूर्ण झाल्यावर कुटुंबासह येऊन बाप्पाचे दर्शन घेतात. धोंड्याच्या महिन्याचे औचित्य साधून विशेषतः माहेरी आलेल्या विवाहित मुली आपल्या पतीसह (जावयांसह) गणपतीच्या दर्शनासाठी आवर्जून येत असल्याने मंदिर परिसरात कौटुंबिक आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीने पिण्याचे पाणी, सावली आणि सुलभ दर्शनासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. “गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे गायगाव येथील श्री गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. धोंड्याच्या महिन्यात जावयाला मान हिंदू संस्कृतीत अधिक मासाला ‘पुरुषोत्तम मास’ किंवा “धोंड्याचा महिना’ म्हटले जाते. या काळात जावयाला विष्णूचे रूप मानून त्याचा विशेष सन्मान केला जातो व अनारशांचे वाण दिले जाते. याच परंपरेचा भाग म्हणून अनेक कुटुंबे जावयाला सोबत घेऊन गायगावच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर