ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

आजपासुन मारेगाव तालुक्याचे कोलगाव नगरीत भक्तीचा महाकुंभ…!

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

श्री संत जगन्नाथ महाराज प्राणप्रतिष्ठा व जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

सुरेश पाचभाई | मारेगाव

मारेगाव तालुक्यातील कोलगाव नगरी आजपासून अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघणार असून ‘आराध्य दैवत वंदनीय विदेही सद्गुरु श्री संत जगन्नाथ महाराज’ यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा तिसरा वर्धापन दिन आणि जन्मोत्सव सोहळ्याला भव्य आणि दणदणीत सुरुवात होत आहे. ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून आणि दानशूरांच्या सहकार्याने उभारलेल्या या पवित्र देवस्थान परिसरात दोन दिवसीय भक्तीमय महाउत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


बुधवार, १५ एप्रिल रोजी सकाळी १०:१० वाजता मूर्ती वंदन सोहळ्याने कार्यक्रमांची मंगल सुरुवात होणार असून त्यानंतर महाप्रसाद (घुगरी काला) वाटप करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजल्यापासून भव्य भजन संमेलन रंगणार आहे.

सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध भारुड सम्राट ह.भ.प. निंबाजी महाराज तागड (वाशिम) व त्यांच्या संचाचा ‘रंगीत तथा संगीत भारुड’ कार्यक्रम रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहे.

गुरुवार, १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून उर्वरित भजन संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. सौ. सुवर्णाताई प्रकाश पिंपळकर यांचे ‘काल्याचे कीर्तन’ होणार असून, भक्ती आणि अध्यात्माचा संगम अनुभवायला मिळणार आहे. दुपारी ४ वाजता महाप्रसाद व त्यानंतर महाभोजनदानाचा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे.

सायंकाळी ७ वाजता ‘भजनसंध्या’ने या भक्तिमय सोहळ्याची सांगता होईल.या दोन दिवसीय सोहळ्यात सहभागी होण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त कोलगाव ग्रामवासीयांच्या वतीने करण्यात आले आहे. कोलगाव नगरीत उभा राहिलेला हा भक्तीचा महाकुंभ भाविकांसाठी एक अद्वितीय आध्यात्मिक पर्व ठरणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर