ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

खापरीच्या 33 केव्ही सबस्टेशनवरील नामफलक दुरुस्त; ग्रामस्थांच्या लढ्याला यश

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील मौजा खापरी येथे उभारण्यात आलेल्या 33 केव्ही सबस्टेशनच्या नामफलकावरील गावाच्या नावातील अखेर दुरुस्त करण्यात आली असून आज दि. 15 एप्रिल रोजी नव्या नामफलकाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनानी नावात सुधारणा करण्यात आली.

खापरी ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या ठरावाद्वारे सबस्टेशनसाठी जागा उपलब्ध करून दिली होती. मात्र प्रत्यक्षात सबस्टेशन खापरीच्या हद्दीत असतानाही नामफलकावर चुकीचे गावाचे नाव नमूद करण्यात आले होते. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. “गावाची ओळखच चुकीची दाखवली जात असल्याने ही बाब आम्हाला मान्य नव्हती,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

स्थानिक नागरिकांनी एकत्र येत महावितरण कार्यालय, मारेगाव येथील अधिकाऱ्यांना निवेदन देत ‘33 केव्ही सबस्टेशन खापरी’ असे योग्य नाव नमूद करण्याची ठाम मागणी केली होती. अखेर प्रशासनाने या मागणीची दखल घेत सकारात्मक निर्णय घेतला आणि नामफलकावरील नाव दुरुस्त केली.

आज झालेल्या उद्घाटन सोहळ्याला  सगणापूर ग्रामपंचायतचे सरपंच दादाराव कपलूजी टेकाम, इजि. सुरेश पाचभाई, ग्रामसेवक नयन पेंदोर, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्यामसुंदर कुर्रा, सहाय्यक अभियंता अतुल आत्राम, प्रधान यंत्रचालक ज्ञानदेव बिहाडे, यंत्रचालक पी.व्ही. पारेलवार तसेच प्रकाश काळे, अनंत खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.या दुरुस्तीमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर