ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने कायम राखली यशाची परंपरा.

126 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कॉलेजची नंदिनी विजय बोबडे तालुक्यात प्रथम.

सुरेश पाचभाई मारेगाव,

दिनांक 25 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने घेतलेल्या माहे.फेब/मार्च 2023 उन्हाळी बोर्डच्या परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालात कला,वाणिज्य,व विज्ञान क. महाविद्यालय मारेगावच्या विद्यार्थ्याने दैदीप्यमान यश संपादन केले.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम ठेवत वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी कु.नंदिनी वि.बोबडे ही तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.तिला 82.00% गुण मिळाले आहे.नंदिनी ही मु.हीवरी ता.मारेगाव येथील शेतकरी कुठुंबातील आहे.शेतकरी कुठुंबातील असल्यामुळे विशेष करून तिचे कौतुक होत आहे.

तसेच तालुक्यातून वाणिज्य शाखेत द्वितीय आलेली विद्यार्थिनी कु.विधि ज.पानेरी हिला 79.83 % गुण मिळाले आहे.ही मु.मारेगाव येथिल आहे ती पण सामान्य कुठुंबातील आहे.तसेच कला शाखेमधून तालुक्यातुन द्वितीय आलेली विद्यार्थिनी कू.प्रणाली ना. गोवारकर हिला 79.00 % गुण मिळाले आहे. हि मु.नरसाळा ता.मारेगाव येथिल रहवाशी आहे.

तसेच कला शाखेमध्ये तृतीय आलेली विद्यार्थीनी कु.पुनम धुर्वे हीला 75.00 % मिळाले आहे ही मु.मार्की येथिल रहवाशी आहे.तसेच प्रथम वर्षीच विज्ञान शाखेचा निकाल हा 100 % लागला आहे.कला शाखेचा निकाल 83. 92 % तर वाणिज्य शाखेचा निकाल 98.03 % लागला आहे.तरी हे सर्व प्रविण्याप्राप्त विद्यार्थी सामान्य,शेतकरी कुठुंबातिल आहे हे विशेष.

या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य चौधरी सर व सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद तसेच आपल्या आई वडिलांना दिले आहे.कला,वाणिज्य,विज्ञान क.महाविद्यालय मारेगाव हे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचं काम नेहमीच करीत आले आहे.

मागेच पावसाळी क्रीडा स्पर्धा मध्ये महाविद्यालयाच्या विद्ार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धा पर्यंत झेप घेतली होती.वेळोवेळी योग्य मार्गदर्शन देऊन त्यांना घडविण्याचे काम शिक्षक करीत आहे.महाविद्यालयामध्ये विद्यार्थांसाठी करिअर मार्गर्शन शिबिर आयोजित केले जाते. जेनेकरून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाचे पर्याय समजेल योग्य करिअर निवडायला मद्दत होईल. महाविद्यालयामध्ये विविध नवनवीन उपक्रम राबविले जातात.

या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.जीवन पाटील कापसे,प्राचार्य हेमंत चौधरी,प्रा.कु आवारी मॅडम,प्रा.अनुप कूरेकर,प्रा.कु.मस्की मॅडम,प्रा.कु.बेतवार मॅडम,प्रा. कु.सातपुते मॅडम,प्रा.अविनाश चिंचुलकर,प्रा.अक्षय चोपणे,प्रा.दानखेडे,प्रा.कु.कुचनकर मॅडम,प्रा.कु.तृप्ती धानोरकर, प्रा.कु. नयना आवारी,प्रा.मडावी,तसेच प्रा.प्रवीण पोटे,निलेश बेंडे (लिपिक),विकास ढोके,पियूष यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर