ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

मारेगाव येथे मनसे तर्फे पंचकुंडीय होम हवन तर शिवसेनेतर्फे साखर वाटप

97 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

प्रभु श्रीरामलल्ला मुर्ती प्राण प्रतिष्ठा राम मंदीर लोकार्पण सोहळा

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव:-येथील हनुमान मंदिरात आज दिनांक २२ जानेवारी २०२४ रोज सोमवारला अयोध्या येथे श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा व श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त शिवसेना व मनसेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अयोध्या येथील राम मंदिर लोकार्पण सोहळा व श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमीत्त मारेगांव येथे हनुमान मंदीरात शिवसेनेच्या वतीने भाविकांना १० क्विंटल साखरेचे मोफत वाटप करण्यात आले.यावेळी मारेगांव तालुका शिवसेना नेते गजानन किन्हेकार,तालुका प्रमुख विशाल किन्हेकार,नगरसेविका सुनिता किन्हेकार,तालुका उपाध्यक्ष विजय मेश्राम,यांच्या सह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच मनसेच्या वतीने हनुमान मंदिरात सकाळी पंचकुंडीय महायज्ञ होम हवन करण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष रुपेश ढोके यांनी सपत्नीक तसेच नागरिकाद्वारे पंचकुंडीय महायज्ञ हवन करण्यात आले. कार्यक्रमाला मनसेचे नेते राजु उंबरकर यांनी भेट देऊन श्रीराम प्राणप्रतिष्ठा निमित्य जनतेला शुभेच्छा दिल्या, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, शहर अध्यक्ष चांद बहादे, आकाश खामनकर यांचे सह मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद वाटप करून करण्यात आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर