ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

बुरांडा ते खापरी रस्ता मोजतोय अखेरची घटका

132 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

– रस्त्यात गिट्टीचे व खड्याचे साम्राज्य.

– अर्धवट कामामुळे खापरी ग्रामस्थ त्रस्त.

सुरेश पाचभाई मारेगांव,

मागील अनेक वर्षांपासून नरकयातना भोगत असलेला बुरांडा ते खापरी या रस्त्याचे काम अजूनही अर्धवटच आहे. या रस्त्यावरील गिट्टी पूर्णपणे उखळून असल्याने येथील नागरिकांना या रस्त्याने चालतांना नरकयातनाच भोगत असल्याचा भास होत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षातही नागरिकांचे हाल मात्र कमी नाही.

मारेगाव तालुक्यातील खापरी येथे जाण्याकरिता हा एकमेव मार्ग असुन हा अखेरची घटका मोजत आहे. बुरांडा ते खापरी हा अडीच किमीचा रस्ता आहे. त्यापैकी जवळपास दोन किमीच्या रस्त्याचे काम झालेले आहे. अर्धा किमीच्या रस्त्याचे काम बाकी आहे.पावसामुळे अर्धा किलो मीटर रस्त्याची अवस्था एवढी बिकट झाली आहे की वाहन तर दुरच राहीले पण पायदळ चालणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या खापरी ते बुरांडा रस्ता हा गेल्या वर्षी पंधरा वर्षांनंतर तयार करण्यात आला आहेत.पण तो ही केवळ दोन किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले आहे.उखळलेल्या रस्त्याने अनेकांच्या दुचाकी पंचर होत आहे.गावात चार चाकी वाहन येणे तर दुरच राहिले एखाद्याचे आरोग्य बिघडल्यास त्याला येथुन तालुक्याच्या ठिकाणी येण्यास मोठी कसरत करावी लागते.आणि बाहेरगावी शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना गिट्टी व खड्यामुळे अथक त्रास सहन करावा लागतो आहे.

सन 2021- 2022 च्या मे महिन्यात अडीच की.मी.पैकी फक्त दोन किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले होते.उर्वरित अर्धा की.मी.रस्ता पूर्णताहा उखडून मोठ मोठे खड्डे तयार झाले आहे.या रस्त्याने पायदळ चालने सुद्धा कठीण बाब आहे.अर्धवट काम झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्याने ये -जा करणाऱ्याला वाटते की रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत येत असुन उर्वरीत अर्धा किलोमीटर रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा अशी गावातली नागरिकांनची मागणी आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर