ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

आर्या धंदरेचे उज्ज्वल यश

5 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील मांगरुळ येथील कु. आर्या मनोज धंदरे हिने CBSE इयत्ता १० वीच्या परीक्षेत 97.40% गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे परिसरात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आर्या ही मांगरुळ येथील यशस्वी उद्योजक मनोज गोरखनाथ धंदरे व सौ. दिप्ती मनोज धंदरे यांची कन्या असून ती वणी येथील अल्फोर्स स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे. विशेष बाब म्हणजे, तिने कोणत्याही बाह्य मार्गदर्शनाशिवाय (कोचिंग क्लासेसशिवाय) हे यश मिळवले आहे.

पुढील शिक्षणासाठी आर्याने त्याच शाळेत राहून JEE परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला असून अभियंता होण्याचे तिचे ध्येय आहे. तिच्या या यशामागे सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध अभ्यास तसेच शाळा व कुटुंबीयांचे मार्गदर्शन हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत.
आर्याने तिच्या यशाचे श्रेय शिक्षक, शाळा प्रशासन, पालक व शुभचिंतक यांना दिले असून त्यांच्या मार्गदर्शन व पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर