ब्रेकिंग न्यूज
FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज…
SP News Maregaon

स्वीकृत नगरसेवकावरून मनसेचा उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम:तीनपैकी एक जागा मनसेला द्या; जागावाटपात शांत राहिलेल्या मनसेची ठाम मागणी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून नवा राजकीय पेच निर्माण झाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या तीन स्वीकृत नगरसेवकांपैकी एक जागा मनसेला द्यावी, अशी आग्रही भूमिका मनसेच्या काही नेत्यांकडून घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मागणीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्यातील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील काही दिवसांत याबाबत निर्णायक घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका निवडणुकीत जागावाटपाच्या वेळी मनसेने तुलनेने कमी जागांवर समाधान मानत ठाकरेंच्या शिवसेनेला अधिकाधिक जागा लढवण्यासाठी मोकळीक दिली होती. त्या वेळी मनसेकडून कोणताही तणाव किंवा अडथळा निर्माण करण्यात आला नव्हता. त्यामुळे आता स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीच्या वेळी तरी ठाकरेंच्या शिवसेनेने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. तीन स्वीकृत नगरसेवकांपैकी दोन ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि एक मनसेचा असावा, असा प्रस्ताव चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. सत्ताधारी पक्षांकडूनही मनसेला काही प्रस्ताव आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे केवळ ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा करून निर्णय घ्यायचा की इतर पर्यायांचाही विचार करायचा, यावर मनसेमध्ये मतमंथन सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या सहा नगरसेवकांना संधी मिळावी, त्यासोबत स्वीकृत नगरसेवकपदही मिळावे, अशी मनसेची भूमिका असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात यंदा प्रथमच 10 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार आहे. 2023 साली विधान परिषदेत मंजूर झालेल्या विधेयकानुसार स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाचवरून दहावर वाढवण्यात आली आहे. त्यामुळे विविध पक्षांना स्वीकृत नगरसेवक देताना नव्या समीकरणांचा विचार करावा लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेनेही आपला दावा ठामपणे मांडण्यास सुरुवात केल्याचे दिसते. महापालिकेतील संख्याबळ पाहता भाजपकडे 227 पैकी 89 नगरसेवक आहेत. त्यामुळे दहा स्वीकृत नगरसेवकांपैकी किमान चार सदस्य भाजपच्या वाट्याला जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भाजपनंतर सर्वाधिक संख्याबळ ठाकरेंच्या शिवसेनेकडे असल्याने त्यांनाही लक्षणीय प्रमाणात स्वीकृत नगरसेवक मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तसेच काँग्रेसलाही स्वीकृत नगरसेवक मिळणार असल्याचे संकेत आहेत. स्वीकृत नगरसेवक ही संकल्पना महापालिकेच्या कामकाजात तज्ज्ञांचा सहभाग वाढवण्यासाठी आहे. या सदस्यांची निवड थेट जनतेकडून होत नाही. प्रशासन, कायदा, आरोग्य, अभियांत्रिकी, शिक्षण, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात अनुभव असलेल्या व्यक्तींना या माध्यमातून सभागृहात स्थान दिले जाते. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार डॉक्टर, वकील, अभियंते, शिक्षक, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते यांना प्राधान्य दिले जाते. नवा पेच आगामी समीकरणांवर परिणाम करणार का या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ठाकरेंची शिवसेना आपल्या तीन स्वीकृत नगरसेवकांपैकी एक जागा मनसेला देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. जर तिन्ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेने स्वतःकडेच ठेवल्या, तर मनसे पुढे कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीपूर्वीच मुंबईच्या राजकारणात निर्माण झालेला हा नवा पेच आगामी समीकरणांवर परिणाम करणार का, याची उत्सुकता वाढली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर