ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

सावत्र आईचा सवतीच्या मुलावर जडला जीव:नवरा देवदर्शनाला जाताच दोघेही जावयाच्या दुचाकीवरून झाले फरार; बीड जिल्ह्यातील घटना

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वेगवेगळ्या गुन्ह्यांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या बीड जिल्ह्यात आता आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक घडली आहे. या घटनेत एक महिला आपल्या सावत्र मुलासोबत फरार झाली असून, यामुळे सामाजिक व कौटुंबिक नैतिक मूल्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बीड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी पत्नी माहेरी गेल्यामुळे एका व्यक्तीने आपल्या 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली होती. त्यानंतर आता उपरोक्त संतापजनक घटना घडली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, केज तालुक्यातील एका गावातील एका व्यक्तीला 2 मुले व 2 मुली आहेत. त्याच्या दोन्ही मुलींची लग्ने झाली आहेत. या व्यक्तीची पत्नी सततच्या वादामुळे मागील 15 वर्षांपासून नवऱ्याला सोडून माहेरी राहते. तर तिची दोन्ही मुले आपल्या वडिलांसोबत राहून शेती करतात. कौटुंबिक कारणांमुळे सदर व्यक्तीने 4 वर्षांपूर्वी एका परित्यक्त्या महिलेशी दुसरे लग्न केली. पती देवदर्शनाला गेल्यानंतर साधली संधी या महिला आपल्या सवतीच्या दोन्ही मुलांसोबत सुखाने संसार करत होती. पण कालांतराने तिचे आपल्या सावत्र मुलाशी प्रेमसंबंध जुळले. एकाच घरात राहून त्यांचे संबंध सुरू होते. त्याची कुणकुण गावकऱ्यांनाही लागली होती. सदर महिलेचा पती गत 12 तारखेला देवदर्शनासाठी मुंबईला गेला. त्यावेळी ही संधी साधून सदर 40 वर्षीय महिला आपल्या सावत्र मुलासोबत पसार झाली. देवदर्शनाहून परतल्यानंतर सदर व्यक्तीला आपली पत्नी व मुलगा पसार झाल्याची गोष्ट कळली. त्यामुळे त्याने तातडीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर करत आहेत. जावयाच्या दुचाकीवरून झाले पसार दुसरीकडे, महिला व मुलगा तेलंगणात गेल्याची माहिती आहे. कारण, ते ज्या दुचाकीवरून (एमएच 13 बी.यू. 1587) पसार झाले, ती दुचाकी त्या महिलेच्या जावयाची आहे. ही दुचाकी वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी पकडली. त्या दुचाकीला 1, 235 रुपयांचा दंड ठोकल्याचा मेसेज 16 एप्रिल रोजीस काळी 11.56 वा. जावयाच्या मोबाईलवर आला. त्यामुळे हे दोघेही तेलंगणात गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, आता पोलिस या दोघांचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे संबंधित कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. परळी कृउबाच्या उपसभापतीवर प्राणघातक हल्ला दुसरीकडे, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा गोवर्धन गावचे माजी सरपंच संजय देशमुख यांच्यावर रविवारी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. संजय देशमुख हे गोवर्धन गावातून सिरसाळ्याकडे येत असताना 2 दुचाकींवरून आलेल्या 6 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवा. त्यात देशमुख जबर जखमी झाले. त्यांना तातडीने स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार केल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली. पण हा हल्ला नेमका कुणी व का केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परळी पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर