ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

कोल्हापुरात तूर्त काँग्रेसचे पारडे जड:12 जागांवर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसही आघाडीवर; लातुरातही काँग्रेसचा वरचष्मा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक निकालात काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. 68 पैकी 40 जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेसने 12 जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपने 7 जागांवर विजय मिळवला आहे. आमदार विनय कोरे यांना बालेकिल्ल्यात धक्का बसल्याचे दिसत आहे. भादोले, घुणकी, सातवे जिल्हा परिषदेचे निकाल समोर आले आहेत या तिनही मतदार संघात आमदार विनय कोरे यांच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार या विजयी झाल्या आहेत. तर पंचायत समिती नवे पारगाव मध्ये काँग्रेसचे भारत विरधवल पाटील यांचा विजयी झाला आहे. तर घुणकी पंचायत समिती जनसुराज्यच्या कल्याणी राजवर्धन मोहिते या विजयी झाल्या आहेत. सातवे जिल्हा परिषद मतदार संघ आणि पंचायत समितीत जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. जिल्हा परिषदेत डॉ. जयंत पाटील यांचा विजय झाला आहे. सातवे पंचायत मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माणिक पाटील विजयी झाले आहेत. माले पंचायत समिती मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या भारती पाटील विजयी झाल्या आहेत. तर भादोले जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या सोनाली सावंत यांचा विजय झाला आहे. आमदार सतेज पाटील यांनी शेवटच्या क्षणी सोनाली सावंत यांना उमेदवारी दिली होती. लातुरात काँग्रेस – भाजपत कडवी लढत दुसरीकडे, लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत काँग्रेसने सर्वाधिक 5 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यानंतर भाजप 3 जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व मनसे आतापर्यंत 1 जागा मिळाली आहे. एक अपक्ष उमेदवारही येथे निवडून आला आहे. सोलापुरात भाजपचा शरद पवार गटाला धक्का दुसरीकडे, सोलापूरच्या माळशिरस तालुक्यात भाजपने शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना भाजपने धक्का दिला आहे. याठिकाणी आमदार उत्तम जानकर यांचे सुपुत्र जीवन जानकर यांचाही पराभव झाला आहे. हाय व्होल्टेज ड्रामा रंगलेल्या दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये भाजपने मारली मुसंडी मारली. आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती यांनी जीवन जानकर यांचा पराभव करत विजयाचा गुलाल उधळला. दहिगाव जिल्हा परिषद गटातील दोन्ही पंचायत समिती देखील भाजपने जिंकल्या आहेत. माळशिरसमधील गुरसाळे गणातून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे, भाजपने मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात गुलाल उधळला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर