ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

बाभळीत पाणी समस्या: स्वतंत्र जलकुंभाची मागणी:राकाँ. शहराध्यक्ष अमोल गहरवार यांच्या नेतृत्वात जीवन प्राधिकरणाला निवेदन

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


दर्यापूर नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ८ मधील बाभळी परिसरात अनेक महिन्यांपासून, तर काही भागांमध्ये दोन वर्षांपासून पाणीपुरवठा अनियमित आहे. या गंभीर पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अमोल अशोकसिंह गहरवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (मजीप्रा) उपकार्यकारी अभियंता विजय शेंडे यांना नुकतेच निवेदन सादर करण्यात आले. नागरिकांना उन्हाळ्यात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जुनी व अपुरी जलवाहिनी बदलून नवीन पाईपलाईन टाकण्याची, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची आणि ज्या भागांमध्ये पाण्याची गंभीर समस्या आहे, तिथे तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. चर्चेदरम्यान, बाभळी परिसरातील वाढती लोकसंख्या, विस्तारित वस्ती आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची टाकी (जलकुंभ) उभारण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. या जलकुंभासाठी आवश्यक प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, अमरावती यांच्याकडे तातडीने पाठवण्यात यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. उपकार्यकारी अभियंता विजय शेंडे यांनी निवेदनकर्त्यांच्या समस्येची दखल घेतली. त्यांनी आवश्यक तो प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले. तसेच, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तांत्रिक पातळीवर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन काळे, आदेश ठाकरे, अमर ठाकरे, गौरव ठाकरे, श्याम ठाकरे, आकाश ठाकरे, ऋषिकेश ठाकूर, विजय भुयार आणि वसीम शहा आदी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर