ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

नागपुरात एनडीपीएस पथकाची मोठी कारवाई:16 लाखांच्या एमडी ड्रग्स अन् शस्त्रास्त्रांसह तिघांना अटक

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नागपूर शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी (एनडीपीएस) पथकाने गिट्टीखदान पोलिस ठाणे हद्दीतील विश्वास नगर परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एमडी (मेफेड्रोन) पावडर, घातक शस्त्रे तसेच चोरीचा संशय असलेले सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण सुमारे 16 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जून रोजी पहाटे 2.50 ते सकाळी 7.40 वाजेदरम्यान दाऊद पान सेंटरजवळील सार्वजनिक रस्त्यावर गस्तीदरम्यान काही संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे 16 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) पावडर आढळून आली. या आरोपींच्या घरांची झडती घेतली असता, सत्तूर, तलवार यांसारखी शस्त्रे तसेच चोरीचा संशय असलेले 88.200 ग्रॅम सोन्याचे आणि 876.800 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. या प्रकरणी आकाश राजू हतागडे (37, विश्वास नगर), योगेश संजू सीरिया (30, गवळीपुरा, सदर) आणि आकाश गजानन टाले (30, मानव सेवा नगर) यांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान, आकाश हतागडे याने एमडी पावडर योगेश सीरियाकडून खरेदी करून ती आकाश टालेला देणार असल्याची माहिती समोर आली. योगेश सीरिया याने ही एमडी पावडर आकाश कटारिया उर्फ अक्कूकडून घेतल्याचे निष्पन्न झाल्याने, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम 8 (क), 22 (ब), 29, भारतीय हत्यार कायदा कलम 4 व 25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर