ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

7 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सुर्ला येथे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज बुधवार (दि. २२ एप्रिल २०२६) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृत शेतकऱ्याचे नाव विलास हरिचंद्र मेश्राम (वय ५१, रा. सुर्ला, ता. झरी जामणी, जि. यवतमाळ) असे आहे. मेश्राम यांच्याकडे सुमारे पाच एकर शेती असून ते शेतीच्या उत्पन्नावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, गेल्या काही काळापासून सततची नापिकी आणि आर्थिक अडचणींमुळे ते मानसिक तणावाखाली होते. याच नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री मेश्राम यांनी घरच्यांना आयपीएल सामना पाहण्यासाठी शेजाऱ्यांकडे जात असल्याचे सांगून घर सोडले होते. मात्र ते रात्री परत न आल्याने कुटुंबीय चिंतेत होते. आज सकाळी कुटुंबीय शेतात गेले असता, त्यांनी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मेश्राम यांचा मृतदेह पाहून एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, मारेगाव येथे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार जयंत कोरवते करीत आहेत.

मेश्राम यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाचा आधारस्तंभ हरपल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, सततच्या नापिकीमुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याने शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातून होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर