ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

ठाणे स्टेशनवर ‘शिवशाही’ बसला भीषण आग:15 प्रवासी थोडक्यात बचावले, बस पूर्ण जळून खाक; मोठी दुर्घटना थोडक्यात टळली

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एक धक्कादायक घटना घडली. सेटीस ब्रिजवर उभी असलेली ‘शिवशाही’ बस अचानक पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच बसमधून धुराचे मोठे लोट बाहेर पडू लागले आणि आगीने भीषण रूप धारण केले. घटनेमुळे स्टेशन परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बस ठाणे येथून पालघरमार्गे बोईसरकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र ठाणे स्टेशनजवळ आल्यानंतर बस अचानक बंद पडली. चालकाने बस तपासण्याचा प्रयत्न करत असतानाच बसच्या खालच्या भागातून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आग लागली. इंजिन आणि डिझेल टाकीजवळून आग लागल्यामुळे ती झपाट्याने पसरली आणि संपूर्ण बसने पेट घेतला. घटनेच्या वेळी बसमध्ये सुमारे 15 प्रवासी होते. आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी तत्काळ बसमधून बाहेर धाव घेतली. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र काही क्षणातच बस पूर्णपणे जळून खाक झाल्याने प्रवाशांचे सामानही नष्ट झाले. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी पाण्याचा जोरदार मारा करत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनीही तत्काळ धाव घेत अग्निशमन दलाला मदत केली. मात्र आगीची तीव्रता इतकी जास्त होती की, बस काही मिनिटांतच पूर्ण जळून गेली आणि केवळ सांगाडा उरल्याचे चित्र दिसून आले. इंजिन गरम झाल्यामुळे आग लागली असावी या घटनेमागे नेमके कारण काय, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा इंजिन गरम झाल्यामुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढल्यामुळे वाहनांमध्ये बिघाड होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे या आगीचा संबंधही तापमानाशी असू शकतो, असे बोलले जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर