ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बाबासाहेब देशमुख विद्यालयाचा सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय झेंडा

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

केळापूर तालुका प्रतिनिधी:- सागर मुळे करंजी

पांढरकवडा : येथील बाबासाहेब देशमुख विद्यालय, पहापळ यांनी ५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी (२०२५–२६) मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. माध्यमिक आदिवासी गटामधून विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावत आपल्या प्रयोगाची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड करून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी विद्यालयाचा प्रयोग राज्यस्तरावर निवडला गेल्याने विज्ञान शिक्षणातील सातत्यपूर्ण गुणवत्तेची प्रचिती आली आहे.

इयत्ता नववीतील कु. अंबिका महादेव धुडे व कु. स्वराली रितेश कडू या विद्यार्थिनींनी “सोलर पॉवर टेन्ट” हा अत्यंत नाविन्यपूर्ण व समाजोपयोगी प्रयोग सादर केला. लडाखसारख्या अतिथंड प्रदेशांमध्ये तसेच जगातील इतर थंड भागांमध्ये हा प्रयोग उपयुक्त ठरणार आहे. ज्या ठिकाणी रात्रीचे तापमान शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते, अशा परिस्थितीतही या टेन्टमध्ये +१० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान राखण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे.

या सोलर पॉवर टेन्टची विशेष बाब म्हणजे दिवसा साठवलेली उष्ण ऊर्जा रात्री वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारची वीज किंवा बॅटरीची आवश्यकता लागत नाही. मार्गदर्शक शिक्षक निलेश लिखार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी जेलसारखा उष्णता साठवणारा विशेष पदार्थ विकसित केला आहे. हा पदार्थ दिवसा सूर्यऊर्जेच्या साहाय्याने उष्णता साठवतो व रात्री टेन्ट उबदार ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जातो.

ही प्रणाली सीमेवरील सैनिक, थंड प्रदेशातील नागरिक, पर्यटक, गिर्यारोहक तसेच संशोधकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधनवृत्ती निर्माण करण्यासाठी निलेश लिखार सातत्याने कार्यरत असून, त्याचेच हे यशस्वी फलित असल्याचे मत व्यक्त होत आहे. या यशामध्ये विज्ञान शिक्षिका कु. शिवानी खडसे यांचेही मोलाचे योगदान लाभले आहे.

या गौरवशाली यशाबद्दल संस्थेचे सचिव सन्माननीय अण्णासाहेब देशमुख पारवेकर यांनी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. संस्था निरीक्षण समितीचे अध्यक्ष अनिस खान, सदस्य मोरेश्वर सरोदे, सुनिल ठाकरे, कु. ज्योती अडपावार व शहरिदास कापसे सर यांनी समाधान व्यक्त केले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय चल्लावार व उपमुख्याध्यापिका कु. ज्योती अडपावार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर