ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

राऊतांना स्वतःची जागा वाचवण्यासाठी ठाकरेंचा पत्ता कट करायचा आहे:विधान परिषद ठाकरेंना, तर राज्यसभा काँग्रेसला असे सपकाळांनी ठणकावले- नवनाथ बन

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मविआमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरू आहे. काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर जात सांगितले की आता विधान परिषद तुम्हाला हवी असेल तर येणाऱ्या राज्यसभेचा निर्णय आताच घ्यावा लागेल. विधान परिषद जर तुम्हाला हवी असेल तर येणारी राज्यसभा काँग्रेसला द्यावी लागेल असे त्यांनी ठणकावत सांगितले आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, विधान परिषद जर उद्धव ठाकरे यांना दिली तर संजय राऊत यांची राज्यसभेची जागा रिकामी होईल त्यावर काँग्रेसने दावा केला आहे. म्हणून उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ नयेत यासाठी संजय राऊत प्रयत्न करत आहेत. आपला पत्ता कट होऊ नये यासाठी ते उद्धव ठाकरेंचा पत्ता कट करण्याच्या प्रयत्नात आहेत. सपकाळ यांनी सवाल केला आहे की आम्हाला संधी कधी मिळणार? आम्ही काय केवळ पाठिंबाच द्यावा का? यामुळे उबाठात राऊत VS ठाकरे असा वाद सुरू झाला आहे. राऊत काँग्रेसमध्ये जाणार नवनाथ बन म्हणाले की, मविआमध्ये पुढील राज्यसभेची जागा काँग्रेसला सुटणार असल्याने संजय राऊत काँग्रेसकडून राज्यसभेवर जाण्याचे प्रयत्न सुरू आहे. एकतर उद्धव ठाकरेंचा पत्ता कट करायचा नाही तर उबाठा सोडून काँग्रेस प्रवेश करत खासदारकी मिळवण्याचा प्रयत्न राऊत यांच्याकडून सुरू आहे.संजय राऊत यांना काँग्रेस रत्न पुरस्कार दिला पाहिजे. कारण काँग्रेसमध्ये राहुल गांधी सुद्धा जेवढी बाजू मांडत नाही तेवढी चांगली बाजू राऊत मांडत असतात. ते खातात उबाठाचे आणि गातात काँग्रेसचे असा टोला बन यांनी लगावला आहे. त्यांच्याकडे काँग्रेस नेतृत्व दिले तर काँग्रेसला अच्छे दिन येऊ शकतात. रश्मीताईंना पक्षप्रमुख करणार का? नवनाथ बन म्हणाले की, महिलांना लोकसभेत 33 टक्के आरक्षण मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले. पण त्याला काँग्रेस, उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि विरोधकांनी विरोध केला. महिला मुख्यमंत्री, महिला पंतप्रधान असे प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही 2019 मध्ये रश्मी ठाकरेंना संधी का दिली नाही? आता पक्षप्रमुख म्हणून आदित्य ठाकरेंचे नाव घोषित न करता रश्मी ठाकरेंचे नाव घोषित करणार का? तुम्ही सातत्याने महिलांचा अपमान करतात. तुमच्या कार्यकर्त्यांकडून पाटकर ताईंना धमक्या दिल्या जात आहे, त्यांचे पुस्तक समोर येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहे. देवाभाऊंच्या राज्यात कोणत्याही महिलेला त्रास होऊ देणार नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर